फेस्टिव्हल विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी वाढविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:41 AM2020-12-05T04:41:49+5:302020-12-05T04:41:49+5:30
दरम्यान, दर बुधवारी पुणे स्थानकाहून निघणारी पुणे-दरभंगा ही एक्स्प्रेस गाडी आता ३० डिसेंबरपर्यंत धावणार आहे. आठवड्यातून एकदा धावणारी दरभंगाहून ...
दरम्यान, दर बुधवारी पुणे स्थानकाहून निघणारी पुणे-दरभंगा ही एक्स्प्रेस गाडी आता ३० डिसेंबरपर्यंत धावणार आहे. आठवड्यातून एकदा धावणारी दरभंगाहून पुण्याकडे येणारी गाडी आता १ जानेवारी २०२१ पर्यंत धावणार आहे. पुणे-गोरखपूर ही प्रत्येक गुरुवारी पुणे स्थानकावरून निघणारी गाडी ३१ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. गोरखपूर स्थानकावरून दर शनिवारी धावणारी गोरखपूर-पुणे एक्स्प्रेस गाडी आता २ जानेवारी २०२१ पर्यंत धावणार आहे. पुणे-लखनऊ फेस्टिव्हल विशेष ही प्रत्येक मंगळवारी धावणारी गाडी २९ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. तर लखनऊ-पुणे फेस्टिव्हल विशेष एक्स्प्रेस आता ३१ डिसेंबरपर्यंत धावणार असल्याचे सांगितले.
पुणे-मांडुआडीह फेस्टिव्हल विशेष गाडी प्रत्येक सोमवारी पुणे स्थानकाहून निघणार आहे. या गाडीचा कालावधी २८ डिसेंबरपर्यंत वाढविला आहे. मांडुआडीह-पुणे या कालावधीत ३० डिसेंबरपर्यंत वाढविला आहे. या सर्व गाड्या दौंड स्थानकावरून जाणार नाहीत. परंतु, नवीन निर्माण करण्यात आलेल्या दौंड कॉर्डलाईन स्थानकाच्या मार्गे गाड्या धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.