सणासुदीचा गाेडवा कमी झाला सामन्य माणूस मेटाकुटीला आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:26 AM2021-08-13T04:26:41+5:302021-08-13T04:26:41+5:30

सोलापूर जिल्ह्यात जवळपास २५ हून अधिक कारखाने आहेत. प्रत्येक कारखान्यात उसाचे गाळप सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न असल्याने ...

The festive mood subsided and the common man came to Metakuti | सणासुदीचा गाेडवा कमी झाला सामन्य माणूस मेटाकुटीला आला

सणासुदीचा गाेडवा कमी झाला सामन्य माणूस मेटाकुटीला आला

Next

सोलापूर जिल्ह्यात जवळपास २५ हून अधिक कारखाने आहेत. प्रत्येक कारखान्यात उसाचे गाळप सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न असल्याने काही कारखान्यांकडून उशिरा गाळप सुरू झाले आहे. याचा परिणाम साखर दरवाढीवर झाल्याचे काही गृहिणींचे मत आहे. बहुतांश कारखान्यांचे गाळप थांबलेले नाही. या कारखान्यांकडून खुल्या बाजारपेठेतही साखर उपलब्ध होत आहे. साखरेचे विविध प्रकार असून जाड साखर ही सर्वाधिक वापरली जात असल्याचे सांगितले जाते. गौरी गणपती, दिवाळी, दसरा या मुहूर्तावर साखरेची मागणी वाढली आहे तर त्या प्रमाणात दरही वाढलेले आहेत.

----

साखरेचे दर (प्रति किलो)

जानेवारी : २३.५० पैसे

फेब्रुवारी : २३.१० पैसे

मार्च : २३. १० पैसे

एप्रिल : २३.५० पैसे

मे : २३.५० पैसे

जून : २३.७५ पैसे

जुलै : २४.०० पैसे

ऑगस्ट : ३५.५० पैसे

-----------

महिन्याचे बजेट वाढले

कोरोना काळात पालेभाज्या शहरात उपलब्ध होत नव्हत्या. त्या पाठोपाठ किराणा साहित्यही उपलब्ध नव्हते. नेमके याच काळात किराणा साहित्याचे दर वाढलेले अनुभवाला आहे. सर्वाधिक तेलाचे दर वाढले. त्या पाठोपाठ आता साखर दरवाढही सोसावी लागणार आहे. लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेला आहे. या दरवाढीवर नियंत्रण राहणे आवश्यक आहे.

- विद्या गायकवाड

गृहिणी

साखरेचे दर प्रथमच १५ दिवसात दहा रुपयांनी वाढले आहेत. ही दरवाढ सर्वसामान्यांसाठी योग्य नाही आणि ती शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरत नाही. ही दरवाढ कारखानदारांना फायद्याची ठरणार आहे. शेतकऱ्याची साखर असून तिचा भाव ठरण्याचा अधिकार कारखानदारांना मिळाला आहे.

मेघा लंबे, गृहिणी

----

मागील चार वर्षात प्रथमच साखरेची दरवाढ झाली आहे. या दरवाढीचा सर्वसामान्यांवर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र आता सणासुदीचे दिवस असल्याने साखरेची मागणी वाढली आहे. दिवाळी होईपर्यंत ही मागणी वाढलेलीच असणार आहे.

- सुमीत भुतडा

केंद्र सरकारकडून दरवर्षी साखर कारखान्यांना गाळपाचा कोटा दिलेला असतो. दरवर्षी गरज पाहता दर महिन्यात कोटाही कमी जादा होतो. वीजदरवाढ, वाहतूक खर्च अशा अनेक कारणास्तव प्रथमच साखर दरवाढ झाली आहे.

- जकप्पा हरळय्या

Web Title: The festive mood subsided and the common man came to Metakuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.