बंधाºयावरील पाणी अडवण्यासाठी आता फायबरची दारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:25 PM2018-04-20T13:25:03+5:302018-04-20T13:25:03+5:30
कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर पाणी अडवण्यासाठी लोखंडी दरांना पर्याय म्हणून नव्या तंत्रज्ञानाचे फायबरची दारे वापरता येतात अशी माहिती सोलापुरातील उद्योजक सूर्या मल्टी प्रॉडक्टचे दत्ताअण्णा सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर: कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर पाणी अडवण्यासाठी लोखंडी दरांना पर्याय म्हणून नव्या तंत्रज्ञानाचे फायबरची दारे वापरता येतात अशी माहिती सोलापुरातील उद्योजक सूर्या मल्टी प्रॉडक्टचे दत्ताअण्णा सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या फायबरच्या दारांची तपासणी शासनाच्या नाशिक येथील मेरी संस्थेकडून करवून घेऊन तसे प्रमाणपत्रही घेण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नदीमधून वाहणारे पाणी गावोगावी थांबावे त्यातून सिंचन क्षेत्र वाढावे आणि शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आणि त्या बंधाºयावर पाणी अडवण्यासाठी लोखंडी प्लेट म्हणजेच चॅनल निडलचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येतो, परंतु पाण्यात लोखंड जास्त काळ टिकत नाही. लोखंडी निडलमध्ये पाणी फार काळ टिकत नाही त्याचबरोबर चॅनल निडलला गंज किंवा त्याची चोरी होणे यातून सरकारला मोठे आर्थिक नुकसान तर होतेच त्याचबरोबर पाणी वाहून गेल्याने शेतकºयांचेही मोठे नुकसान होते.
शासनस्तरावर शेतकºयांसाठी बांधण्यात येणारे बंधारे आणि त्यांचा उद्देश सफल होत नाही म्हणूनच या सर्व समस्यांवर उपाय म्हणून नवे तंत्रज्ञान वापरून बंधाºयावर पाणी अडवण्यासाठी कायमस्वरूपी टिकेल असे फायबरचे दरवाजे तयार करता येतील का याचा विचार केला आणि त्यानुसार सूर्या मल्टी प्रॉडक्ट इपोंर्ट एक्स्पोर्टच्या माध्यमातून विविध देशात पाहणी करण्यात आली त्यातून जर्मनी येथून फायबर निडलचे तंत्रज्ञान आणले जे अमेरिकेच्या स्टँर्डडप्रमाणे आहे. त्यानंतर दक्षिण कोरियातील सेऊलमध्ये हे नवे तंत्रज्ञान विकसित करून तेथेच तयार करण्यात आले.
आता सध्या त्याचा वापर आपल्या देशातील बंधाºयासाठी पर्यायाने शेतकºयांच्या हितासाठी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील सिंचनक्षेत्र वाढून शेतकरी समृद्ध होण्यास मदत झाली असेही दत्ताअण्णा सुरवसे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राजकुमार सुरवसे उपस्थित होते.
३५0 फायबर निडल बसविले...
- सोलापूर जिल्ह्यातील तिºहे, अर्जुनसोंड आणि शिंगोली येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर ३५0 फायबर निडल बसवण्यात आले आहेत. फायबर निडल बंधाºयावर बसवल्यानंतर या निडलमधील जोडणीमधून पाणी गळती होऊन पुढे वाहून गेले नाही. बंधाºयावर ५ मीटरपर्यंत पाणी थांबल्याने पाण्याची साठवण मोठ्या प्रमाणात झाली. पूर्वी पाणी सोडल्यानंतर अवघ्या काही दिवसातच पाणी वाहून जात होते, परंतु फायबरचे निडल बसवल्यानंतर तीन-तीन महिने पाणी बंधाºयात साठून राहू लागले असल्याचे दत्ताअण्णा सुरवसे यांनी सांगितले.