दहाव्याचा पाचव्या तर तेराव्याचा विधी सातव्या दिवशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:20 AM2021-03-19T04:20:50+5:302021-03-19T04:20:50+5:30
माजी आमदार धनाजी साठे यांच्या पत्नी मंदाकिनी साठे यांच्या मृत्यूनंतर परंपरेप्रमाणे तिसऱ्या दिवशीचा रक्षा विसर्जनाचा विधी पर्यावरणपूरक व्हावा यासाठी ...
माजी आमदार धनाजी साठे यांच्या पत्नी मंदाकिनी साठे यांच्या मृत्यूनंतर परंपरेप्रमाणे तिसऱ्या दिवशीचा रक्षा विसर्जनाचा विधी पर्यावरणपूरक व्हावा यासाठी शेतात नातवंडांच्या हस्ते ११ झाडांची लागवड करण्यात आली. त्यात कनिष्का, नातू वेदांत, हर्षवर्धन व अजय चव्हाण यांनी वृक्षारोपण करून रक्षा विसर्जन केले.
याशिवाय माजी आमदार धनाजी साठे, दादासाहेब साठे व नगराध्यक्षा मीनल साठे यांनी दहाव्या दिवसाचा विधी पाचव्या दिवशी तर तेराव्याचा विधी सातव्या दिवशी करण्यात येणार असल्याचा धाडसी निर्णय घेतला. सर्व विधी नदीकाठी न करता दहन दिलेल्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
फोटो
१८माढा०१
ओळी
मंदाकिनी साठे यांच्या तिसऱ्या दिवशीच्या विधीनंतर वृक्षारोपण करून रक्षा विसर्जन करताना कनिष्का साठे, वेदांत साठे, हर्षवर्धन साठे व अजय चव्हाण.