रस्ते, पूल, जलसंपदा विभागासाठी साडेपंचावन्न कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:26+5:302021-03-13T04:41:26+5:30

सांगोला : सांगोला विधानसभा मतदार संघातील गावांना जोडणाऱ्या ८ रस्त्यांच्या दुरुस्तीसह पुलांच्या बांधकामासाठी तसेच सांगोला येथील नवीन विश्रामगृहाचे बांधकाम ...

Fifty five crore sanctioned for roads, bridges, water resources department | रस्ते, पूल, जलसंपदा विभागासाठी साडेपंचावन्न कोटी मंजूर

रस्ते, पूल, जलसंपदा विभागासाठी साडेपंचावन्न कोटी मंजूर

Next

सांगोला : सांगोला विधानसभा मतदार संघातील गावांना जोडणाऱ्या ८ रस्त्यांच्या दुरुस्तीसह पुलांच्या बांधकामासाठी तसेच सांगोला येथील नवीन विश्रामगृहाचे बांधकाम व जलसंपदा विभाग, सांगोला शाखा कालवा प्रकल्पासाठी २५ कोटी ७४ लाख रुपये, यापूर्वी मंजूर असलेल्या रस्ते दुरुस्तीसाठी २७ कोटी ८० लाख रुपये, सांगोला ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर बांधकामासाठी २ कोटी रुपये असे एकूण ५५ कोटी ५४ लाख रुपये चालू अर्थसंकल्पात मंजूर झाल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

सांगोला विधानसभा मतदार संघातील तालुक्यांत नवीन ५ रस्ते व पुलाचे बांधकाम, भाळवणी गटातील नवीन ३ रस्त्यांची कामे व पुलाचे बांधकाम, सांगोला शहरात आधुनिक सोयी-सुविधांचा समावेश असलेले नवीन विश्रामगृह बांधकामासाठी २ कोटी १९ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. रस्ते व पुलांमध्ये भाळवणी-महिम-महूद बु. रस्ता सुधारणा करणे (२ कोटी), बचेरी-शिंगोर्णी-कटफळ-अचकदाणी-सोनलवाडी-मंगेवाडी-वाटंबरे-निजामपूर-हणमंत गाव ते सोनंद-भोपसेवाडी-घेरडी रस्ता सुधारणा करणे (१ कोटी २५ लाख), कमलापूर-चिनके-बलवडी रस्ता सुधारणा करणे (१ कोटी २५ लाख), दिघंची जिल्हा हद्द खवासपूर-लोटेवाडी-सोनलवाडी-एकतपूर-सांगोला-वाढेगाव-मेडशिंगी-आलेगाव-वाकी-शिर्डी-वाणीचिंचाळे-भोसे रस्ता सुधारणा (१ कोटी ५० लाख), लोटेवाडी-अचकदाणी-गळवेवाडी-वाकी शिवणे-हलदहिवडी रस्ता सुधारणा (१ कोटी ५० लाख), भाळवणी-महिम-महूद रस्त्यावर बांधकामासाठी (३ कोटी १२ लाख), भाळवणी गटातील जैनवाडी-धोंडेवाडी रस्ता सुधारणा करणे (१ कोटी ३५ लाख), भंडीशेगाव-उपरी रस्ता सुधारणा करणे (२ कोटी ५० लाख), पळशी-सुपली रस्त्यासह पुलाच्या बांधकामासाठी (४ कोटी), जलसंपदा विभाग सांगोला शाखा कालवा प्रकल्पासाठी ५ कोटी रुपये व अगोदर सुरू असलेल्या कामांना २९ कोटी ८० लाख रुपये असा एकूण ५५ कोटी ५४ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

कोट ::::::::::::::::::::

महिन्याभरात या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील. या कामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून कामे मंजूर करून घेतली आहेत.

- ॲड. शहाजीबापू पाटील

आमदार, सांगोला मतदारसंघ

Web Title: Fifty five crore sanctioned for roads, bridges, water resources department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.