२५ दिवस आजाराशी झुंज देत रुग्णालयात सोडला प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:23 AM2021-05-06T04:23:02+5:302021-05-06T04:23:02+5:30
अक्कलकोट : मिरजगी (ता. अक्कलकोट) येथील पोलीस पाटील शिवलिंग निंबाळ (३६) यांचे आजाराशी झुंज देत २५ व्या दिवशी सोलापूर ...
अक्कलकोट : मिरजगी (ता. अक्कलकोट) येथील पोलीस पाटील शिवलिंग निंबाळ (३६) यांचे आजाराशी झुंज देत २५ व्या दिवशी सोलापूर येथे उपचारादरम्यान बुधवारी पहाटे निधन झाले. वीस दिवसांपूर्वी निंबाळ यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून त्यांचे भाऊ रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते.
दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने कर्नाटकातील विजापूर येथे नातेवाइकांच्या मदतीने एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथून पुन्हा सोलापूर येथे आणून उपचार सुरू होते. सर्वकाही व्यवस्थित झाल्याने सोमवारी सकाळी आयसीयूमधून जनरल वाॅर्डात दाखल करण्यात आले होते. मात्र, तो सतत या कालावधीत हॉस्पिटलमध्ये विविध रुग्णांचे निधन झाल्याच्या चर्चा करीत होता. त्यावर त्याचे भाऊ समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर, बुधवारी पहाटे ५ वाजता अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार होता.
त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.
०५शिवलिंग निंबाळ