कमलापूर येथे दोन गटांत हाणामारी; सहाजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:57+5:302021-08-23T04:24:57+5:30

ज्ञानू मोहन श्रीराम, शांताबाई मोहन श्रीराम, अनिता प्रकाश टाकळे, संतोष नामदेव टाकळे, सुमन नामदेव टाकळे, राणी संतोष टाकळे अशी ...

Fighting between two groups at Kamalapur; Six injured | कमलापूर येथे दोन गटांत हाणामारी; सहाजण जखमी

कमलापूर येथे दोन गटांत हाणामारी; सहाजण जखमी

Next

ज्ञानू मोहन श्रीराम, शांताबाई मोहन श्रीराम, अनिता प्रकाश टाकळे, संतोष नामदेव टाकळे, सुमन नामदेव टाकळे, राणी संतोष टाकळे अशी जखमींची नावे आहेत. ज्ञानू श्रीराम हा २१ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास आदलिंगे वस्ती-कमलापूर येथील शेतात तो आणि आई शांताबाई गवत आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी प्रकाश टाकळे याच्याविरुद्ध तक्रारी अर्ज कसा दिला, असे विचारले. यावेळी संतोष टाकळे, नामदेव टाकळे, प्रकाश टाकळे, राहुल आदलिंगे यांनी गैरकायद्याची मंडळी एकत्र करून शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी त्याची आई शांताबाई श्रीराम भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता त्यांना सुमन नामदेव टाकळे, राणी संतोष टाकळे, रूपाली प्रकाश टाकळे यांनी शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून भाऊ बिरा श्रीराम, पुतण्या सतीश श्रीराम, मायाप्पा आश्रम यांनी धावत येऊन सदरची भांडणे सोडवासोडवी केली. त्याच दिवशी दुपारी ४.३० च्या सुमारास अनिता प्रकाश टाकळे व तिचा दीर संतोष नामदेव टाकळे हे डाळिंब बागेतील काढलेले गवत घेऊन जात असताना ज्ञानू मोहन श्रीराम, बिरा मोहन श्रीराम, मोहन लक्ष्मण श्रीराम, सतीश गोपाळ श्रीराम, शांता मोहन श्रीराम, सारिका बिरा श्रीराम, भामाबाई ज्ञानेश्वर श्रीराम यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून तू आमच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारअर्ज का दिला, या कारणावरून दीर संतोष यास मारहाण करून जखमी केले. हे भांडण सोडवण्यासाठी भावजय अनिता टाकळे, सासू सुमन टाकळे व जाऊ राणी टाकळे या तिघींमध्ये गेल्या असता सतीश श्रीरामसह इतरांनी काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ दमदाटी केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Fighting between two groups at Kamalapur; Six injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.