विनाकारण फिरणाऱ्यांच्या गाड्या जप्त करून गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:39+5:302021-04-29T04:17:39+5:30
पोलीस अधीक्षक सातपुते यांनी शहरातील संचारबंदीसह कर्नाटक सीमेवरील चेक पोस्टची पाहणी केली. दरम्यान त्यांनी शहरातील बैठकीत पोलिसांना सूचना केल्या. ...
पोलीस अधीक्षक सातपुते यांनी शहरातील संचारबंदीसह कर्नाटक सीमेवरील चेक पोस्टची पाहणी केली. दरम्यान त्यांनी शहरातील बैठकीत पोलिसांना सूचना केल्या. सातपुते म्हणाल्या, सकाळी ११ वाजल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील एकही दुकान सुरू राहता कामा नये. जर कोणी उघडे ठेवण्याचे प्रयत्न करून कायदे मोडत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, सील ठोका, तसेच दिवसभर विनाकारण मोटारसायकल घेऊन फिरणाऱ्यांच्या गाड्या जप्त करा. त्या गाड्या लॉकडाऊन संपेपर्यंत सोडू नका. दंडात्मक कारवाई करा, शंभर टक्के बंद दिसले पाहिजे.
यावेळी त्यांनी वागदरी- हिरोळी कर्नाटक सीमेवरील हद्दीतील चेक पोस्टची पाहणी केली. त्याही ठिकाणी कर्मचाऱ्यांना नियमाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर दक्षिण पोलीस ठाण्याचे हद्दीतील दुधनी येथील सिनूर रस्त्यावरील पॉइंटला भेट दिली. त्याही ठिकाणी संबंधितांना कर्नाटकातून येणाऱ्या गाड्या सोडू नका. रात्रीचा पहारा ठेवा. अनोळखी व्यक्ती, गाड्यांवर लक्ष ठेवा, वाहनाची तपासणी करा, अशा सूचनाही केल्या.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस निरीक्षक विजय जाधव, सहा. पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी, पोलीस उपनिरीक्षक चंदू बेरड, गोपनीय विभागाचे पोलीस नाईक धनराज शिंदे उपस्थित होते.
फोटो
२८अक्कलकोट-एसपी दौरा
ओळ
वागदरी- हिरोळी, महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील चेक पोस्टची पाहणी करताना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी.