जमीन पुन्हा नावावर करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 08:57 AM2021-12-01T08:57:46+5:302021-12-01T08:58:08+5:30
पंढरपुरातील घटना;
पंढरपूर : व्याजाने पैसे दिले अन जमीन लिहून घेतली. परंतु ज्यादा व्याज मागून जमीन नावावर करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सावकारा विरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
वाखरी (ता.पंढरपूर) येथे संजय लेंगरे यांची वाखरी (ता.पंढरपूर) येथे वडीलोपार्जीत शेती गट नं २४/४/अ मधील त्याचे वाट्याला १ एकर जमिन आहे. सन २०१६ साली संजय लेंगरे याच्या कुटुंबाला तातडीचे पैशाची निकड पडल्याने त्यांनी इसबावी पंढऱपुर येथील सतिश तानाजी घंटे यांच्याकडुन ५ लाख ४५ हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात त्यांनी सतिश तानाजी घंटे यांना १ एकर वडीलोपार्जीत जमिनिपैकी २० गुंठे जमिन लिहुन दिली होती. त्यावेळी ती रक्कम परत केल्यानंतर जमिन परत देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे संजय लेंगरे यांनी २३ जुलै २०१८ रोजी सतिश तानाजी घंटे यांना २ लाख रुपये परत केले होते. उर्वरीत रक्कम देखील परत करुनाही जमिन संजय लेंगरे याच्या नावावर केली नाही. उलट सतिश तानाजी घंटे यांनी संजय लेंगरे यांना तुमची मुद्दल व व्याज मिळुन २० लाख रुपये होतात असे सांगितले.
संजय लेंगरे यांनी ५ लाख ४० हजार रुपये ऐवजी ७ लाख रुपये घे परंतू आमची जमिन आम्हाला परत दे असे सांगीतले. परंतू त्याने त्यास नकार दिला व २० लाख रुपयेची मागणी करु लागला आहे.
त्याला वारंवार ठरल्याप्रमाणे पैसे घे व आमची जमिन आम्हाला परत दे असे सांगीतले. परंतु त्याने पैसे परत न मिळाल्यास मी जमिन दुस-याला विकुन टाकतो असे सांगु लागला. म्हणुन संजय लेंगरे यांची पत्नी वैशाली संजय लेंगरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सतिश तानाजी घंटे यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार हे करीत आहेत.