अतिरिक्त पाण्यातून सर्व पाझर तलाव भरून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:16 AM2021-06-21T04:16:22+5:302021-06-21T04:16:22+5:30
सध्या टेंभू योजनेतून माण नदीत पाणी सोडल्याने सांगोला तालुक्यातील माण नदीकाठच्या गावातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. कृष्णा नदीचे पावसाचे ...
सध्या टेंभू योजनेतून माण नदीत पाणी सोडल्याने सांगोला तालुक्यातील माण नदीकाठच्या गावातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. कृष्णा नदीचे पावसाचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी म्हैसाळ योजनेतून सोडून लाभक्षेत्रातील पारे-घेरडी तलाव, हंगीरगे तलाव, गळवेवाडी बंधारा व जवळा तलाव भरून द्यावा, हेच पाणी कोरडा व अफ्रुका नदीत सोडून या नदीवरील सर्व बंधारे भरून द्यावेत. यामुळे पारे, डिकसळ, नराळे, हबिसेवाडी, हंगिरगे, जवळा, घेरडी, गळवेवाडी, सोनंद, आगलावेवाडी, भोपसेवाडी, कडलास, सांगोला, मेडशिंगी, आलेगाव, वाढेगाव व परिसरातील गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असून पावसाळी आवर्तन तसेच कायम ठेवून याद्वारे सांगोला विधानसभा मतदार संघातील तिसंगी-सोनके तलाव व सांगोला तालुक्यातील चिंचोली तलाव भरून द्यावा. चिंचोली तलावात पाणी सोडल्यास चिंचोली, धायटी, बामणी, सांगोला, बिलेवाडी, देशमुखवस्ती, देवकतेवाडी परिसराला याचा फायदा होणार आहे.
तिसंगी तलावात पाणी सोडल्यास तिसंगी, सोनके, बोहाळी, उंबरगाव यासह सांगोला व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील लाभक्षेत्रातील गावांना या पाण्याचा फायदा होणार असल्याचे माजी आ. दीपक साळुंखे-पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.