महापालिकेतील रिक्त पदे भरुन घ्या, अन्यथा काही खरं नाही : अविनाश ढाकणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 02:14 PM2019-02-23T14:14:15+5:302019-02-23T14:16:24+5:30

सोलापूर : संपूर्ण शहराची माहिती असलेले आठ ते दहा अधिकारी महापालिकेत राहिले आहेत. त्यांच्यापैकी काहीजण निवृत्त होत आहेत तर ...

Fill in the municipal vacancies, otherwise it is not true: Avinash Dhakane | महापालिकेतील रिक्त पदे भरुन घ्या, अन्यथा काही खरं नाही : अविनाश ढाकणे

महापालिकेतील रिक्त पदे भरुन घ्या, अन्यथा काही खरं नाही : अविनाश ढाकणे

Next
ठळक मुद्दे महापालिका प्रशासनाच्या वतीने सभागृहात डॉ. अविनाश ढाकणे यांचा निरोप समारंभ वेळेवर आकृतिबंध मंजूर करुन घ्या आणि रिक्त पदे भरुन घ्या - डॉ. अविनाश ढाकणेसंपूर्ण शहराची माहिती असलेले आठ ते दहा अधिकारी महापालिकेत राहिले - डॉ. अविनाश ढाकणे

सोलापूर : संपूर्ण शहराची माहिती असलेले आठ ते दहा अधिकारी महापालिकेत राहिले आहेत. त्यांच्यापैकी काहीजण निवृत्त होत आहेत तर काहीजण स्वेच्छानिवृत्तीच्या तयारीत आहेत. वेळेवर आकृतिबंध मंजूर करुन घ्या आणि रिक्त पदे भरुन घ्या, अन्यथा काही खरं नाही, असा इशारा माजी मनपा आयुक्त तथा जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सत्ताधारी भाजपा पदाधिकाºयांना दिला. 

 महापालिका प्रशासनाच्या वतीने सभागृहात डॉ. ढाकणे यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता, यावेळी ते बोलत होते. महापौर शोभा बनशेट्टी, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृह नेते संजय कोळी, पोलीस उपायुक्त शशिकांत महानवर, परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के, परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, नगर अभियंता संदीप कारंजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनपा उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी केले.

डॉ. ढाकणे म्हणाले, लोकांच्या अपेक्षा खूप आहेत, पण त्या रास्त आहेत. मी आमच्या अधिकाºयांना नेहमी सांगायचो की आपण कमी पडतो म्हणून लोक नगरसेवकांकडे जातात. नगरसेवकांनी खरं तर धोरणं ठरवायची असतात. शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन होते. पण यंदा हिप्परगा तलाव कोरडा पडल्याने हे नियोजन कोलमडले. पाणीपुरवठा विभागात काम करायला अधिकारी तयार नाहीत. महापालिकेची आर्थिक स्थिती वाईट आहे. पण पैसे कुठूनही येतील, गरज आहे आकृतिबंध पूर्ण करण्याची. पूर्ण शहराची माहिती असलेले अधिकारी नसतील तर नव्याने येणाºया माणसांना सर्व गोष्टी समजून घेण्यास वेळ लागेल. रिक्त पदे भरुन घ्या. 

रात्रीच उठून बसायचो...
- आपण ठरविलेले काम पूर्ण होत नसेल तर मला त्रास व्हायचा. मंगळवारी अधिकाºयांच्या बैठकीनंतर माझा रक्तदाब वाढलेला असायचा. असे अनेकदा झाले की मला रात्र-रात्रभर झोप येत नसे. रात्रीच उठून कॉम्प्युटरसमोर बसून प्रलंबित कामांना गती देण्यासाठी काय करता येईल याचा विचार करायचो. संभाजी तलाव आणि सिध्देश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम माझ्या काळात झाले असते तर आनंद झाला असता. सिध्देश्वर तलाव सुशोभीत होईल तेव्हा काळजी घ्या. त्यात कचरा टाकून पावित्र्य घालवू नका, असेही ढाकणे यांनी सांगितले. 

शहरातील शाळा, आरोग्य केंद्रे, बागा यात आमूलाग्र बदल झाला. स्मार्ट सिटी ही एका विशेष भागापुरती योजना असली तरी डॉ. ढाकणे यांनी भुयारी गटार, एलईडीसारख्या कामातून सर्व शहराला त्याचा लाभ मिळवून दिला. 
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक, शिवसेना

माझ्यात आणि डॉ. ढाकणे यांच्यात अनेकदा चांगली चर्चा झाली. परवा वादही झाले. लोकप्रतिनिधीने लोकभावना समजून घेऊन काम करायला हवे तर अधिकाºयांनी प्रशासनाच्या बाजूने काम करायचे असते. आमच्यात अनेकदा फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार या विषयावर चर्चाही झाली. ती आम्ही कधीही विसरणार नाही. 
- आनंद चंदनशिवे, गटनेते, बसपा. 

डॉ. ढाकणे यांनी कामगारांकडून काम करुन घेतले, त्याला तोड नाही. आम्ही ४० वर्षांपासून मनपा आर्थिक संकटात असल्याचे ऐकतोय. पण डॉ. ढाकणे यांनी कामगारांची पेन्शन, रजेचे प्रकरण, ग्रॅज्युएटीचे प्रश्न मार्गी लावले. 
- अशोक जानराव, कामगार नेते. 

Web Title: Fill in the municipal vacancies, otherwise it is not true: Avinash Dhakane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.