अखेर रेल्वे बोगद्यातील रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:21 AM2021-03-25T04:21:38+5:302021-03-25T04:21:38+5:30
मोडनिंब येथील रेल्वे खात्याने मोडनिंब व परिसरातील वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी रेल्वे रुळाखालून बोगदा तयार केला, मात्र या बोगद्याचे काम ...
मोडनिंब येथील रेल्वे खात्याने मोडनिंब व परिसरातील वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी रेल्वे रुळाखालून बोगदा तयार केला, मात्र या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे डांबरीकरण केले नव्हते. त्यामुळे त्या येथून ये -जा करणारे चारचाकी दुचाकी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी लेखी पत्राद्वारे प्रकल्प संचालकांशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून या बोगद्यातील रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी केली होती. हा बोगदा रेल्वेने केल्यामुळे तो डांबरीकरण करण्यास राष्ट्रीय महामार्ग तयार नव्हते. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून या रस्त्यातून मोडनिंबसह शेटफळ बावी, पडसाळी, रोपळे, उपळाई, सिद्धेवाडी, तेलंगवाडी, खंडाळी, पापरी या भागातील शेतकरी व अन्य वाहनधारकांना मोडनिंबमध्ये आवश्यक असणाऱ्या शेतकरी व अन्य खरेदीसाठी यावे लागत होते. सध्या या रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाल्यामुळे मोडनिंब परिसरातील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. सध्या या बोगद्यामध्ये विजेची सोय नसल्यामुळे वाटसरुंना अंधारातून ये-जा करावे लागत आहे. तरी त्याचीही सोय करावी अशीही मागणी मनसेने केली आहे.
फोटो
२४मोडनिंब०१
ओळी
मोडनिंब येथील रेल्वे बोगद्याखालील रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे.