अखेर पाच टीएमसी पाण्याचा आदेश रद्द; सोलापूर जिल्ह्यात आनंदी आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:50+5:302021-05-28T04:17:50+5:30

जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भय्या देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिनबापू जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत ...

Finally cancels five TMC water order; Anandi Anand in Solapur district | अखेर पाच टीएमसी पाण्याचा आदेश रद्द; सोलापूर जिल्ह्यात आनंदी आनंद

अखेर पाच टीएमसी पाण्याचा आदेश रद्द; सोलापूर जिल्ह्यात आनंदी आनंद

Next

जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भय्या देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिनबापू जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील, मोहोळ पंचायत समितीच्या उपसभापती साधना देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील, विठ्ठल आबा मस्के, सचिन पराडे-पाटील, रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रंशात महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ, दादासाहेब गायकवाड, अतुल भालेराव, अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड, सिद्धार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक, सौरभ आरकिले, अमोल पाटील, अकोले बु.चे सरपंच सतीश आबा सुर्वे, उपसरपंच बशीर मुलाणी, ग्रां. प. सदस्य कल्याण नवले, रमेश पवार, तुषार पाटील, सुजीत दरगुडे यावेळी उपस्थित होते.

-----

कोट

आजचा शासन निर्णय हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. इथून पुढे सोलापूर जिल्ह्याने उजनी धरणाबाबत अलर्ट राहणे गरजेचे आहेत.

-

प्रा. सुहास पाटील, संपर्कप्रमुख सोलापूर जिल्हा रयत क्रांती संघटना

---

शासनाने रद्द केलेल्या आदेशाचे स्वागत करतो, तरीदेखील जबाबदार अधिकाऱ्याने आम्हास पत्र देताच हे आंदोलन स्थगित केले जाईल. जिल्ह्यातील सर्व आमदारांनी येणाऱ्या अधिवेशनात उजनी धरणातून इथून पुढच्या काळात एकही योजना मंजूर केली जाऊ नये, अशा प्रकारचा ठराव मंजूर करून घ्यावा. इंदापूरची जनता ही माझीच आहे. इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्‍नासाठी मी स्वतः १३ जूननंतर इंदापूर तहसील कार्यालयासमोर खडकवासलातून ९ टीएमसी पाणी देण्याचा ठराव झालेला असताना इंदापूर तालुक्याला पाणी का मिळाले नाही. यासाठी आंदोलन करणार आहे.

- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना

----

या आंदोलनात संभाजी ब्रिगेड सुरुवातीपासूनच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिली. आम्हाला यश मिळाले याचा मनस्वी आनंद वाटतो. इथून पुढेही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मी आंदोलनासाठी तयार असणार आहे.

- सचिन जगताप, संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्ष

----

या निर्णयाचे स्वागत करतो पण निर्णय घेतलाय कोणी व हा आदेश रद्द करण्याचा अधिकार उपसचिवांना आहे का? याची देखील शहानिशा व्हायला पाहिजे. इंदापूर तालुक्याला पुणेजवळूनच खडकवासलातून पाणी द्यावे.

-

संजय कोकाटे माढा विधानसभा शिवसेना नेते

----

उजनी जलाशयातून इंदापूरला दिल्या जाणाऱ्या पाच टीएमसी पाण्याचा आदेश गेल्या आठवड्यात रद्द करण्याचे तोंडी आदेश राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांनी दिले होते. आ. संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्यातील अन्य नेतेमंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीमध्ये आदेश रद्द करण्यासाठी मंत्री महोदयांकडून जो शब्द देण्यात आला होता, तो त्यांनी पाळला. आज त्यासंदर्भात शासनाकडून लेखी आदेशाचे पत्र प्राप्त झाले आहे.

- बबनराव शिंदे, आमदार

----

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने सुरुवातीपासूनच जलसमाधी आंदोलन असेल, सिंचन भवन मीटिंग, रस्त्यावर टायर पेटवून निषेध आंदोलन, आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन अशा माध्यमातून जिल्ह्यातीलच नव्हे तर जलसंपदामंत्र्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन, पालकमंत्र्यांचा निषेध अशा मार्गाने माऊली हळवणकर, दीपक भोसले, दीपक वाडदेकर या सहकाऱ्यांच्या सहकार्याने आंदोलने केली. वेगवेगळ्या प्रकारचे ७ गुन्हे दाखल होऊनसुद्धा माघार घेतली नाही. त्यामुळे आजचा दिवस पाहायला मिळाला याचा आनंद वाटतो. इथून पुढच्या काळातही उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती पाण्यासाठी सतर्क राहील.

-

अतुल खुपसे, अध्यक्ष उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती

----

Web Title: Finally cancels five TMC water order; Anandi Anand in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.