परस्पर कर्ज काढल्याप्रकरणी आमदार पुत्रासह तिघांविरुद्ध अखेर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:22 AM2021-04-22T04:22:34+5:302021-04-22T04:22:34+5:30
याबाबत न्यायालयाकडून हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देताच शेतकरी पांडुरंग थोरबोले (वय ४८, रा. ...
याबाबत न्यायालयाकडून हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देताच शेतकरी पांडुरंग थोरबोले (वय ४८, रा. काळेगाव ता.बार्शी) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी तत्कालीन शाखाधिकारी बँक ऑफ इंडिया शाखा ढगे मळा बार्शी, बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज तुर्क पिंपरीचे चेअरमन रणजितसिंह बबनराव शिंदे व एक अनोळखी इसम अशा तिघांविरुद्ध भादंवि ४१९, ४२०, ४६७, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा फसवणुकीचा प्रकार घडल्यानंतर वसुलीसाठी बँकेची नोटीस आल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे व शहर पोलिसांत याबाबत तक्रारी करूनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी बार्शी न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करून त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.