...अखेर सांगोला-महुद रस्त्यावरील खड्डे बुजविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 AM2021-07-25T04:20:22+5:302021-07-25T04:20:22+5:30
जत-इंदापूर राष्ट्रीय महामार्गावरील सांगोला-महुद रोडवर पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून खड्डेमय रस्ता धोकादायक बनला आहे. रात्री-अपरात्री ...
जत-इंदापूर राष्ट्रीय महामार्गावरील सांगोला-महुद रोडवर पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून खड्डेमय रस्ता धोकादायक बनला आहे. रात्री-अपरात्री वाहनधारकांना खड्ड्यांतील पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहने अडकून वाहतुकीची कोंडी होत आहे. याबाबत शनिवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच राष्ट्रीय महामार्ग विभागाला खडबडून जाग आली. शनिवारी जेसीबीद्वारे पाण्याचा निचरा होण्यासाठी शिवणे गावाजवळ दोन्ही बाजूंनी चारी खोदून पाण्याला वाट करून दिली. तर मुरूम टाकून सर्व खड्डे बुजवून घेतले आहेत. या रस्ता दुरूस्ती कामाला कार्यकारी अभियंता विजय स्वामी भेट देणार असल्याचे सांगितले.
सांगोला-महूद रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांत तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी खड्डे बुजवून नव्याने डांबरीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे दादासाहेब घाडगे, माजी सभापती बाळासाहेब काटकर यांनी केली आहे.
फोटो ओळ :::::::::::::::
सांगोला-महुद रस्त्यावरील शिवणे गावाजवळ जेसीबीच्या सहाय्याने मुरूम टाकून खड्डे बुजविल्याचे छायाचित्र.