अखेर मलिकपेठच्या सीना नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:19 AM2021-02-08T04:19:56+5:302021-02-08T04:19:56+5:30

मोहोळ-वैराग, मोहोळ-बार्शी या रोडवरील मोहोळ, पंढरपूर, सातारा या परिसरातील नागरिकांना नरखेड, बार्शी, वैराग, तुळजापूर याकामी अंतराने दळणवळणाची सोय व्हावी ...

Finally, traffic resumed from the bridge over the Sina river at Malikpeth | अखेर मलिकपेठच्या सीना नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू

अखेर मलिकपेठच्या सीना नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू

Next

मोहोळ-वैराग, मोहोळ-बार्शी या रोडवरील मोहोळ, पंढरपूर, सातारा या परिसरातील नागरिकांना नरखेड, बार्शी, वैराग, तुळजापूर याकामी अंतराने दळणवळणाची सोय व्हावी म्हणून मागील २० वर्षांपूर्वी नवीन पुलाचे काम मंजूर होऊन ते चालू केले होते. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचा गट भूसंपादन केल्याने आणि संबंधित नुकसानग्रस्त शेतकरी -माणिक नामदेव आवारे यांच्या न्यायालयातील अपिलामुळे कामाला अनेकवेळा स्थगिती मिळाली. त्यामुळे काम कधी चालू तर कधी बंद अशा अवस्थेत सहा ते सात ठेकेदारांनी आणि सहा उपअभियंत्यांनी काम करूनसुद्धा अपूर्णच होते. सातवा ठेकेदार जी.के. देशमुख यांनी भराव्याचे काम पूर्णत्वास आणले.

२००० साली पुलाच्या कामाची निविदा करण्यात आली होती. काम पूर्ण होण्यास तब्बल २० वर्षं लोटली.

९ वर्षांपूर्वी पुलाचे मध्य भागातील काम पूर्ण झाले होते. परंतु मलिकपेठ व नरखेडकडील भराव्याचे काम आणि पुलावरील काही भागाचे काम अपूर्ण होते. अखेर ते काम पूर्ण झाले.

चारपट पैसे खर्च

सध्याच्या कामाला अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे चारपट पैसे खर्च झाले. तालुका पातळीपासून वरिष्ठ सर्व शासकीय अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसह पुलाच्या कामाबद्दल चांगले सहकार्य केले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या सहकार्यामुळेच शेतकरी माणिक नामदेव आवारे यांना ३ एकर ११ गुंठ्यासाठी २० वर्षांपासूनचा ९८ लाख रुपयांचा मोबदला मिळवून दिला आहे. यापूर्वी वाहतूक धोकादायक बंधाऱ्यावरू चालू होती. काम पूर्ण झाल्याने नव्या पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने या भागाचा २० वर्षांपासूनचा वाहतुकीचा वनवास संपला आहे, असे झेडपी सदस्य उमेश पाटील यांनी सांगितले.

फोटो

०७नरखेड०१

ओळी

मलिकपेठ येथील सीना नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

Web Title: Finally, traffic resumed from the bridge over the Sina river at Malikpeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.