अखेर घाटणे बॅरेजमधून मोहोळसाठी पाणी सोडले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पेढे भरवून आनंद व्यक्त
By काशिनाथ वाघमारे | Published: March 3, 2024 07:48 PM2024-03-03T19:48:17+5:302024-03-03T19:48:28+5:30
मोहोळ शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी २ मार्चला रात्री १० वाजता घाटणे बॅरेजचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले.
सोलापूर: मोहोळ शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी २ मार्चला रात्री १० वाजता घाटणे बॅरेजचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. हे पाणी ३ मार्चला पहाटे ५:३० वाजता कोळेगाव बंधाऱ्यात पोहोचले आहे. ते पाणी १० एमटीएफसी एवढे आहे. मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर आनंद व्यक्त केला. सीना नदीपात्रात अष्टे कोळेगाव बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन केले.
यावेळी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, तालुका उपाध्यक्ष हेमंत गरड, शहराध्यक्ष रुपेश धोत्रे, माजी नगरसेवक मुस्ताक शेख, शहर कार्याध्यक्ष नागेश बिराजदार, अतुल गावडे, दत्तात्रय खवळे, संतोष खंदारे, दाजी गाढवे, रफिक हरणमारे, गौतम क्षीरसागर, अझरुद्दीन शेख, गणेश पवार, संतोष धोत्रे, बाळू धोत्रे, शकील शेख, राजू सुतार, कल्पना खंदारे, यशोदा कांबळे, आदी उपस्थित होते.
घाटणे बॅरेज बंधाऱ्यामधून १६ एफसीएफटी पाणी मोहोळच्या कोळेगाव बंधाऱ्यासाठी सोडून दिले होते. त्यापैकी सहा एमसीएफटी पाण्याचे नुकसान झाले असून, मोहोळच्या कोळेगाव बंधाऱ्यांमध्ये दहा एमसीएफटी पाणी साठले आहे. आता घाटणे बॅरेज बंधाऱ्यांमध्ये ५.२५ एमसीएफटी पाणी शिल्लक राहिले आहे.
रात्री ग्रस्त वाढवा... विद्युत मोटारी बंद ठेवा
राष्ट्रवादीच्या दोन गटांतील संघर्षातून आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात सोडण्यात आलेले हे पाणी आता नगरपरिषद प्रशासनाने जबाबदारी घेऊन टिकविले पाहिजे. आष्टे कोळेगाव परिसरामध्ये दिवसा व रात्रीची ग्रस्त ठेवून परिसरातल्या शेती पंपाच्या विद्युत मोटारी बंद ठेवल्या, तरच ते पाणी मोहोळ शहराला किमान दीड महिना पुरणार आहे. अन्यथा नदी परिसरातील विद्युत मोटारी सुरू राहिल्यास पंधरा दिवसांतच ते पाणी संपेल आणि पुन्हा मोहोळ शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.