लॉकडाऊनमध्ये पोस्ट बॅंकेकडून आर्थिक आधार; सोलापूर जिल्ह्यात साडेतीन कोटी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:43 PM2020-12-19T12:43:11+5:302020-12-19T12:45:14+5:30

लॉकडाऊन काळ : बॅंका, एटीएम बंद असताना पोस्ट बॅंकेने घरी जाऊन दिली रक्कम

Financial support from Post Bank in lockdown; Three and a half crore allocated in Solapur district | लॉकडाऊनमध्ये पोस्ट बॅंकेकडून आर्थिक आधार; सोलापूर जिल्ह्यात साडेतीन कोटी वाटप

लॉकडाऊनमध्ये पोस्ट बॅंकेकडून आर्थिक आधार; सोलापूर जिल्ह्यात साडेतीन कोटी वाटप

Next

सोलापूर : टपाल कार्यालयातील बचत खात्याचे पैसे तर सोडाच लॉकडाऊन काळात पोस्टमन दादांनी इतर बँकांच्याही खातेदारांना पैसे देऊन दिलासा दिला. या काळात जवळपास तीन कोटी ५० लाख रुपये वाटप करून सर्वसामान्यांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. यासाठी जिल्ह्यात ४०० पोस्टमनने परिश्रम घेतले.

बदलत्या काळात सर्वसामान्यांच्या व्यवहाराचे माध्यम म्हणून पोस्ट कार्यालयांनी भूमिका बजावयला सुरुवात केली आहे. ऑक्टोबरमधील आढावा पाहाता जिल्ह्यात पोस्टाचे एकूण सहा लाख ३० हजार ६३२ ग्राहक आहेत. हे ग्राहक वर्षभरात अनेक प्रकारचे व्यवहार पोस्टातून करतात. देशभरात इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि सेव्हिंग बँक अशा दोन भागात आर्थिक व्यवहार चालताे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेअंतर्गत (आयपीपीबी) ५७,५०० जणांची खाती उघडली गेली आहेत, ही खाती खोलत असताना त्यांच्यामार्फत चार कोटी पाच लाख रुपयांच्या ठेवी घेतल्या आहेत.

 

कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना बाहेर पडण्यावर बंधन घालण्यात आले हाेते. अशा अडचणीच्या काळात सोलापूर विभागात ५१ हजार लोकांच्या घरी जाऊन साडेतीन कोटी रुपयांचे वाटप केले. यामध्ये वयोवृद्ध, पेन्शनधारक आणि कामगारवर्ग यांचा समावेश आहे. तसेच पोस्टाशिवाय इतर बँकांचेही ग्राहक होते. ४०० पोस्ट कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन ही रक्कम वाटप केली.

रुग्णांच्या घरी जाऊन केली औषधवाटप

कोरोनाकाळात संसर्गाच्या भीतीने कोणी बाहेर पडू शकत नव्हते. कोरोना आणि इतर रुग्णांच्या आजारी लोकांना इतर शहरातून आलेली औषधे, इंजेक्शन संंबंधिताच्या घरी पोहोच केली. याशिवाय धोकादायक नियमित रजिस्टर, पोस्ट पत्रे आणि पार्सल वाटप केली. या काळात मधुमेही, एचआयव्ही बाधित आणि कर्करुग्णांची औषधे सर्वाधिक होती. दिवाळी आणि रक्षाबंधन काळातही पोस्ट कर्मचाऱ्यांनी अशीच मेहनत घेतली. सर्व घटकात सर्वात सुरक्षित आणि वेळेत त्यांनी सेवा दिली.

विद्यार्थ्यांसह ५७,५०० जणांनी उघडली खाती

अलीकडील काळात पोस्टावरील विश्वास वाढत राहिल्याने आणि समाधानकारक सेवा देत गेल्याने विद्यार्थ्यांसह ५७,५०० जणांनी खाती उघडली आहेत.

लॉकडाऊनकाळात मदत

ज्याचे खाते पोस्टात नाही, परंतु इतर बँकेत आहे, अशांनाही घरी जाऊन आधार क्रमांकाच्या आधारे थम घेऊन लॉकडाऊन काळात पैसे दिले. याकाळात जनतेची सेवा महत्त्वाची होती.

- एस.पी. पाठक, प्र.डाक अधीक्षक

Web Title: Financial support from Post Bank in lockdown; Three and a half crore allocated in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.