लग्नासाठी पन्नासहून अधिक उपस्थिती मंगल कार्यालयास पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:29 AM2021-02-27T04:29:16+5:302021-02-27T04:29:16+5:30

करमाळा शहरात शुक्रवारी दिवसभरात ७ हजार २०० रुपये दंड वसूल केला. अंतिम संस्काराकरिता २० पेक्षा जास्त लोकांना सहभागी होता ...

A fine of five thousand rupees for more than fifty attendance marriages for the wedding | लग्नासाठी पन्नासहून अधिक उपस्थिती मंगल कार्यालयास पाच हजारांचा दंड

लग्नासाठी पन्नासहून अधिक उपस्थिती मंगल कार्यालयास पाच हजारांचा दंड

Next

करमाळा शहरात शुक्रवारी दिवसभरात ७ हजार २०० रुपये दंड वसूल केला.

अंतिम संस्काराकरिता २० पेक्षा जास्त लोकांना सहभागी होता होणार नाही. तसेच ६५ वर्षावरील व्यक्ती व रुग्णांनी, गरोदर स्त्रिया व १० वर्षाखालील लहान मुलांनी आरोग्य विषयक व अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे. इतर वेळी घराबाहेर पडणे टाळावे. या आदेशानुसार करमाळा नगर परिषदेकडून कारवाई करण्याकरिता आठ पथके स्थापन केली आहेत. यात सर्व नगर परिषद कर्मचारी व शिक्षकांचा समावेश आहे.

त्यानुसार कारवाई दरम्यान आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शुक्रवारी एका मंगल कार्यालयावर व विनामास्क दिसणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. एकूण ७ हजार २०० रुपये दंड आकारण्यात आला.

नागरिकांनी कोरोना वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर मास्क लावावा, सुरक्षित अंतराचा नियम पाळावा, सतत हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी वीणा पवार यांनी केले आहे.

-----

अशी घेतली जाणार ॲक्शन

लग्न सोहळयात ५० पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाल्यास पहिल्यांदा ५ हजार रुपये दंड व दुसऱ्यांदा त्याच कार्यालयाने आदेशाचे उल्लघंन केल्यास १० हजार रुपये दंडासह मंगल कार्यालय ३० दिवसाकरिता सील करण्यात येणार आहे. दुकानामध्ये विनामास्क ग्राहक आढळल्यास दुकानदारास प्रथम १ हजार दंड व दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास २ हजार दंड व दुकान ३० दिवसाकरिता बंद करण्यात येणार आहे. बस स्थानक व इतर गर्दीची ठिकाणे यांची देखील पाहणी करुन विनामास्क व्यक्ती आढळल्यास १ हजार दंड करण्यात येणार आहे. हॉटेल, बीअर बार, परमिट रुम, केस कर्तनालय, ब्युटीपार्लर यांची देखील तपासणी करुन ग्राहक, कर्मचारी विनामास्क आढळल्यास व नियमांच उल्लंघन केल्याचे आढळल्यास २ हजार दंड प्रथम व दुसऱ्या उल्लंघनास ४ हजार व आस्थापना ३० दिवसाकरिता बंद केली जाणार आहे.

अशी घेतली जाणार ॲक्शन

लग्न सोहळ्यात ५० पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाल्यास पहिल्यांदा ५ हजार रुपये दंड व दुसऱ्यांदा त्याच कार्यालयाने आदेशाचे उल्लघंन केल्यास १० हजार रुपये दंडासह मंगल कार्यालय ३० दिवसाकरिता सील करण्यात येणार आहे. दुकानामध्ये विनामास्क ग्राहक आढळल्यास दुकानदारास प्रथम १ हजार दंड व दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास २ हजार दंड व दुकान ३० दिवसाकरिता बंद करण्यात येणार आहे. बसस्थानक व इतर गर्दीची ठिकाणे यांची देखील पाहणी करुन विनामास्क व्यक्ती आढळल्यास १ हजार दंड करण्यात येणार आहे. हॉटेल, बीअरबार, परमिट रुम, केस कर्तनालय, ब्युटीपार्लर यांची देखील तपासणी करुन ग्राहक, कर्मचारी विनामास्क आढळल्यास व नियमांच उल्लंघन केल्याचे आढळल्यास २ हजार दंड प्रथम व दुसऱ्या उल्लंघनास ४ हजार व आस्थापना ३० दिवसाकरिता बंद केली जाणार आहे.

----

फोटो २६करमाळा- कोरोना ॲक्शन

करमाळा शहरात विनामास्क मोटारसायकल वर फिरणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करताना नगर परिषदेचे पथक.

Web Title: A fine of five thousand rupees for more than fifty attendance marriages for the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.