शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात तंबाखू सेवन केल्यास 200 रुपये दंड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 07:29 PM2020-11-25T19:29:04+5:302020-11-25T19:29:19+5:30

जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचे आदेश

A fine of Rs 200 is levied on government officials and employees for consuming tobacco in the office | शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात तंबाखू सेवन केल्यास 200 रुपये दंड 

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात तंबाखू सेवन केल्यास 200 रुपये दंड 

googlenewsNext

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तंबाखू खाणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. प्रत्येक कार्यालयामध्ये तंबाखूमुक्त कार्यालय असे फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तंबाखूमुक्त कार्यालयासाठी निकष खालीलप्रमाणे

  • कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेरील बाजूस तंबाखूमुक्त कार्यालय किंवा तंबाखूमुक्त संस्था करणारे माहितीचे फलक लावण्यात यावेत.
  • - कार्यालयाच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास प्रतिबंध आहे. असा फलक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असावा. या नियमाचे उल्लंघन केल्यास तंबाखू विक्रेत्यावर सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 नुसार 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
  • - कार्यालयीन परिसरामध्ये तंबाखू खाऊन थुंकल्यास पोलीस अधिनियम 195 अंतर्गत 150 रुपये दंड आकारण्यात येईल.
  • -. धुम्रपान प्रतिबंध- येथे धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे, असा फलक 60 बाय 30 से.मी. आकारात कार्यालयाच्या आतमध्ये लावणे बंधनकारक आहे.
  • -. कार्यालयात जनजागृतीसाठी तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती देणारे फलक लावण्यात यावेत.

Web Title: A fine of Rs 200 is levied on government officials and employees for consuming tobacco in the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.