तीन हॉटेल, एका मंगल कार्यालयासह ७२ जणांवर २६ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:26 AM2021-03-01T04:26:24+5:302021-03-01T04:26:24+5:30
सांगोला तालुक्यात कोरोनाचा उद्रेक कमी असल्याने नागरिक बिनधास्त झाले आहेत. मास्क व शारीरिक अंतराचे पालन करण्यात कुचराई करीत आहेत. ...
सांगोला तालुक्यात कोरोनाचा उद्रेक कमी असल्याने नागरिक बिनधास्त झाले आहेत. मास्क व शारीरिक अंतराचे पालन करण्यात कुचराई करीत आहेत. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सांगोला प्रशासन अलर्ट झाले असून रविवारी आठवडा बाजारासह गर्दीच्या ठिकाणी नगरपालिका, महसूल व पोलिसांनी संयुक्त मोहीम राबविली. मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
रविवारी शहरातील विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत तीन हॉटेल, एका मंगल कार्यालयासह ७२ जणांकडून २५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक संजय दौडे,
लेखापाल जितेंद्र गायकवाड, तलाठी हरिश्चंद्र जाधव, पो.ना. पवार, पो.ना. बनसोडे, नगरपालिका कर्मचारी निलेश कांबळे, किरण धनवजीर, सनी बाबर, सनी कांबळे, अविराज माने यांनी कारवाई केली. घराबाहेर निघताना मास्क घालूनच बाहेर निघावे, शारीरिक अंतराचे पालन करावे, व्यापारीबांधवांनी मास्क वापरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.