कोरोनाकाळात केला ३० लाख रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:20 AM2021-03-14T04:20:59+5:302021-03-14T04:20:59+5:30
सांगोला पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे पोहेकॉ दत्तात्रय खिलारे, पोकॉ शंभूदेव घुगे, प्रवीण जाधव, लालासाहेब कदम यांनी ही कारवाई केली. ...
सांगोला पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे पोहेकॉ दत्तात्रय खिलारे, पोकॉ शंभूदेव घुगे, प्रवीण जाधव, लालासाहेब कदम यांनी ही कारवाई केली. लॉकडाऊन काळात घराबाहेर पडणे, रस्त्यावर विनाकारण मोकाट फिरणे, बंदी असतानाही नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर सांगोला पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता.
गेल्या वर्षभरात पोलीस प्रशासनाकडून मास्कचा वापर टाळणाऱ्या १९ हजार ५१७ जणांकडून २७ लाख ३० हजार ३००, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ३०६ जणांकडून २१ हजार २००, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या १३७ नागरिकांकडून १३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. संचारबंदीत दुचाकीवर ट्रिपल सिट प्रवास करणाऱ्या ५८८ जणांकडून ३४ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला. लॉकडाऊन काळात निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या ५४ व्यापाऱ्यांकडून ५४ हजार, चारचाकी वाहनातून तीनपेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करणाऱ्या १०१ वाहनधारकांकडून ५० हजार ५०० रुपये इतका दंड वसूल केला.
कोट :::::::::::::::::::
सांगोला शहर व तालुक्यात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. व्यापारी, दुकानदार, हॉटेल्स, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.
- भगवानराव निंबाळकर
पोलीस निरीक्षक, सांगोला.