विनामास्क फिरणाऱ्या १०४ जणांकडून ४० हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:22 AM2021-05-23T04:22:26+5:302021-05-23T04:22:26+5:30
माढा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात विनाकारण फिरणाऱ्या १०४ जणांवर कारवाई करीत ४० हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...
माढा
: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात विनाकारण फिरणाऱ्या १०४ जणांवर कारवाई करीत ४० हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शनिवारी दिवसभरात माढा पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. तर परिसरातील सहा दुकानांवर कारवाई कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांच्या संख्येत घट दिसून आली. लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. मात्र, दवाखान्याच्या नावावर अनेक कोविड रुग्ण रस्त्यावर पहायला मिळत आहेत.
पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केवड गावात अचानक नाकाबंदी लावून विनाकारण फिरणाऱ्या ५० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये दोघांची चाचणी पॉझिटिव्ह आली. सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, हवालदार बालाजी घोरपडे, अझर शेख, पोलीस नाईक पांडुरंग देशमुख, पोलीस चंद्रकांत गोरे यांनी ही कारवाई केली.
---
२२माढा ॲक्शन
माढा पोलीस स्टेशनच्या वतीने विनामास्क विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या वतीने केवड येथे कारवाई करण्यात आली.
----