पाच लाखांचा दंड अन‌् ४० वाहने केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:21 AM2021-05-01T04:21:03+5:302021-05-01T04:21:03+5:30

महामारीचा ग्रामीण भागातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, या नियमांना झुगारून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांमुळे ...

A fine of Rs 5 lakh and 40 vehicles confiscated | पाच लाखांचा दंड अन‌् ४० वाहने केली जप्त

पाच लाखांचा दंड अन‌् ४० वाहने केली जप्त

Next

महामारीचा ग्रामीण भागातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, या नियमांना झुगारून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांमुळे महामारीचा फैलाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अखेर पोलिसांना आपला खाक्या दाखवीत अशा लोकांवर कारवाईचे पाऊल उचलणे भाग पडत आहे.

जिल्हाबंदी, नाकाबंदी आदी गोष्टींमुळे सध्या पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. तरीही माळशिरस पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसत आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कोट ::::::::::::::::::::::::

महामारीच्या संकटातून वाचण्यासाठी नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर बाहेर येऊ नये. प्रशासनाच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे नाइलाजाने दंडात्मक कारवाई अथवा वाहन जप्त करणे अशी कारवाई करणे पोलिसांना क्रमप्राप्त ठरले आहे. कृपया नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.

-

आदिनाथ महानवर

सहायक पोलीस निरीक्षक, माळशिरस

फोटो :::::::::::::::::::::::::::::::

माळशिरस पोलीस स्टेशन परिसरात जप्त केलेली वाहने.

Web Title: A fine of Rs 5 lakh and 40 vehicles confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.