कोरोनाचे नियम तोडणा-यांकडून साडेसात लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:19+5:302021-03-15T04:21:19+5:30
बार्शी : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना शासनाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर बार्शीत ...
बार्शी : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना शासनाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर बार्शीत प्रशासनाने कारवाई करुन ७ लाख ५४ हजारांचा दंड वसूल केला.
शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंग न पाळणे अशी धातलेली बंधने ताेडल्याप्रकरणी कारवाई केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांनी त्याच्या उपविभागात कारवाईची मोहीम हाती घेतली. या कारवाईत बार्शी शहर, बार्शी तालुका, वैराग, पांगरी व माढा पोलीस ठाणे अंतर्गत कारवाईची अंमलबजावणी करुन साडेसात लाखाचा दंड वसूल केला.
---
१७१० केसेस
या कारवाईत बार्शी शहरात तीन लाख ७२, ६०० रुपये, बार्शी तालुका हद्दीत एक लाख ३५ हजार रुपये, पांगरी हद्दीत १ लाख ७ हजार रुपये, वैराग हद्दीत एक लाख ४८ हजार रुपये आणि माढा हद्दीत ५६ हजार ६०० रुपये दंड वसूल करुन १७१० केसेस करुन दंड वसूल केला आहे.