विनामास्क दिसल्यास भरावा लागणार ५०० रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:22 AM2021-03-16T04:22:47+5:302021-03-16T04:22:47+5:30

कोरोना महामारी रोखण्यासाठी लोकसहभागातून पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जे नागरिक ...

A fine of Rs | विनामास्क दिसल्यास भरावा लागणार ५०० रुपये दंड

विनामास्क दिसल्यास भरावा लागणार ५०० रुपये दंड

Next

कोरोना महामारी रोखण्यासाठी लोकसहभागातून पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जे नागरिक नियमांचा भंग करतील, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. अकलूज शहरातील नागरिक सुशिक्षित आणि कायद्याचा आदर करणारे असल्याने गतवर्षी तालुक्यात कोरोना सर्वात शेवटी संक्रमित झाला होता. लॉकडाऊनसारख्या समस्यांना सामोरे जायचे नसेल, तर पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोट ::::::::::::::

अकलूज परिसरात विनामास्क वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. दररोज ५० जणांवर प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे दंड आकारला जात आहे. दररोज जवळपास २५ हजार रुपये दंड गोळा होत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक आहे.

- अरुण सुगावकर

पोलीस निरीक्षक, अकलूज

Web Title: A fine of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.