सांगोल्यात मोकाट फिरणाऱ्यांकडून ७६ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:22+5:302021-05-21T04:23:22+5:30
सांगोला : विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर आणि विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात सांगोला पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तोंडाला मास्क न बांधणे, दुकाने ...
सांगोला : विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर आणि विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात सांगोला पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तोंडाला मास्क न बांधणे, दुकाने उघडी ठेवणे अशा अनेक कारणांन्वये २४० जणांवर कारवाई करून ७५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगोला शहरात वर्दळीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक मोहीम हाती घेतली. मास्कप्रकरणी ९० जणांवर कारवाई करून ४५ हजार, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ४२ जणांकडून ८ हजार ४०० रुपये, सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या ९१ जणांकडून ९ हजार १०० रुपये, वेळेत दुकाने बंद न करणाऱ्या ९ जणांकडून ९ हजार रुपये, दुचाकीवर डबल सीट प्रवास करणाऱ्या ६ जणांकडून ३ हजार रुपये, चारचाकी वाहनांतून चारपेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करणाऱ्या दोघांकडून १ हजार रुपये अशा २४० लोकांकडून ७५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
---