विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांकडून पावणेसात लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:08+5:302021-06-06T04:17:08+5:30

अवैध दारू, जुगार व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करीत वाळूसह वाहने अशी दीड कोटीची मालमत्ता जप्त ...

A fine of Rs | विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांकडून पावणेसात लाखांचा दंड वसूल

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांकडून पावणेसात लाखांचा दंड वसूल

googlenewsNext

अवैध दारू, जुगार व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करीत वाळूसह वाहने अशी दीड कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. या स्थितीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केल्याने चेन ब्रेक करण्यास चांगली मदत झाल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

१ ते ३१ मे एक महिन्याच्या कालावधीत मोहोळ शहरातील शिवाजी चौक, कन्या प्रशाला चौक व कुरूल चौक दूरक्षेत्र, बीटमध्ये पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे, फौजदार संतोष माने, खापरे, हवालदार नीलेश देशमुख, मुन्ना बाबर, शरद डावरे, गणेश पोपळे, जाधव, पवार, आदींसह होमगार्ड यांनी ही कार्यवाही केली.

----

कोरोनाच्या काळात विशेष मोहीम

लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीच्या ४७ केसेस करीत २,५१,१६२ रुपये मुद्देमाल जप्त केला. जुगाराच्या नऊ केसेस करून ११,६६० रोख रक्कम जप्त केली. अवैध वाळूच्या सात केसेस करून १५ आरोपींना अटक केली. १५० ब्रास वाळूसह १० ट्रॅक्टर, १ जे.सी.बी. असा सुमारे दीड कोटीचा माल जप्त केला आहे.

Web Title: A fine of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.