शेळीपालन गोठयाला भीषण आग, ११ शेळ्या जळून खाक, ६ शेळयांची मृत्युंशी झुंज सुरूच
By admin | Published: April 21, 2017 04:22 PM2017-04-21T16:22:36+5:302017-04-21T16:22:36+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
कुसळंब/बार्शी दि २१ : बार्शी तालुक्यातील ताडसौंदणे येथील मुरहरी मुकींदा सातपुते यांच्या शेळीपालन गोठ्यावरुन वीज वितरण कंपनीच्या तारा गेल्या होत्या़ ताराच्या घर्षणामुळे ठिणगी पडून गोठ्याला आग लागली़ या घटनेत ११ शेळ्या जळून खाक झाल्या तर ६ शेळ्या मरणाशी झुंज देत आहेत़ या आगीत एकूणच ३ ते ४ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे़
याबाबत माहिती अशी की, मुरहरी मुकींदा सातपुते (रा.ताडसौंदणे) यांनी गेल्या दोन वषार्पूर्वी शेतीला जोड धंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय त्यांच्या गट नंबर २३९ मधील शेतात सुरु केला होता़ शेतीची शेळीपालनची चांगली जोड लागली होती़ या जोडधंद्यावर मिळणाऱ्या आर्थिक उत्पादनावर घरसंसार चालत होता़ मात्र गुरुवारी मध्यरात्री अचानक शेळीपालन गोठ्यावरुन गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षनामुळे ठिणग्या पडून अचानक पेट घेतल्यामुळे पुर्ण गोठाने पेट घेतला़ यात ११ शेळया जळून खाक झाल्या तर ६ शेळ्यांची मृत्युशी झुंज देत आहेत़ या घटनेची माहिती तहसिल कार्यालयास मिळताच गावकामगार तलाठी दिपक खोटे व वीज कंपनी चे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे़ यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी कांबळे,अमोल भालेराव, दादा शिंदे ,राहुल पाटील ,राम सातपुते, संतोष सातपुते, संभाजी सातपुते उपस्थित होते.