ऊसाच्या फडाला लागली आग, आगीत होरपळून वृध्दांचा मृत्यू
By Admin | Published: April 6, 2017 01:53 PM2017-04-06T13:53:51+5:302017-04-06T13:53:51+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
करमाळा दि ६ : शेलगाव (ता. करमाळा) येथे उसाच्या फडाला आग अचानक आग लागुन झालेल्या दुर्घटनेत वृद्ध जागीच जळुन ठार झाला आहे. ही दुर्घटना गुरूवारी सकाळी साडे नऊ च्या आधी (गट नंबर २७२) हिरालाल ठोकळ (रा.शेलगाव) यांच्या शेतात घडली आहे .
दाजीराम मस्कु कर्चे (वय ७५)रा. मुळगाव महादेव पिंपरी, ता. माळशिरस हल्ली शेलगाव (क) ता. करमाळा असे या आगीत मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत खबर मृत वृद्धाचा मुलगा मारुती दाजीराम कर्चे (वय ४०) रा. शेलगाव यांनी करमाळा पोलिस ठाण्यात दिली आहे.
माळशिरस तालुक्यातील कर्चे कुटुंब शेलगाव येथील ठोकळ यांच्या शेतात मजुरीसाठी राहत होता. आज सकाळी कर्चे कुटुंबीय घरापासुन थोड्या अंतरावर असलेल्या शेतात काम करत असताना घराजवळ असलेल्या उसाचा फडातुन साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उस पेटुन धुर निघत असल्याचे दिसले. त्यावेळी जळत असलेल्या उसाकडे धाव घेतले. या दरम्यान वीस गुंठे ऊसा पैकी पाच ते सात गुंठे ऊसापर्यत आग पोहचली होती. त्यावेळी सर्वांनी मिळुन आग विजवण्याचा प्रयत्न केला व आग आटोक्यात आणली. यावेळी जळालेल्या ऊसाच्या फडात मयत दाजीराम यांचा संपुर्ण जळालेला मृतदेह आढळुन आला. त्यांना करमाळा येथे उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करुन आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तरी आग लागलेली असताना विझवण्यासाठी गेल्यानंतर आगीत होरपळून दाजीराम यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज घरच्यांनी व्यक्त केला असुन तशी फिर्याद करमाळा पोलिसात दिली आहे. याप्रकरणाचा हवालदार तानाजी टिंगरे हे करीत आहेत.