सांगोला सूत गिरणी परिसरात आग; ३०० वृक्ष जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:22 AM2021-03-26T04:22:11+5:302021-03-26T04:22:11+5:30
या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सांगोला-मिरज रोडवर शेतकरी सहकारी सूत गिरणीची सुमारे १४० एकर जमीन आहे. त्यापैकी ३५ ...
या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सांगोला-मिरज रोडवर शेतकरी सहकारी सूत गिरणीची सुमारे १४० एकर जमीन आहे. त्यापैकी ३५ एकर जमीन महिला सूत गिरणीसाठी देण्यात आली आहे. त्यातील बारा एकर क्षेत्रावर जंगली झाडे, चिंच अशी शेकडो झाडे असून, त्यात मोठया प्रमाणावर गवत उगवले आहे. या जमिनीच्या वरून महावितरणची ३३ केव्ही क्षमतेची विजेची लाईन गेली आहे.
गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या क्षेत्रातील गवत वाळलेले असल्याने आग मोठया प्रमाणात पसरत गेली. आगीची माहिती मिळताच शेतकरी सूत गिरणीचे चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी सूत गिरणीचे कर्मचारी, सांगोला नगरपालिकेचे अग्निशमन दल व इतरांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र गवत वाळलेले असल्याने १२ एकर क्षेत्रातील गवत ३०० झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.