सबस्टेशनमध्ये लागलेल्या आगीमुळे फळबागेच्या पानांसह ठिबकचे साहित्य जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:21 AM2021-02-14T04:21:20+5:302021-02-14T04:21:20+5:30

भोपसेवाडी-जवळा (ता. सांगोला) येथील शेतकरी निलेश सदाशिव माने यांच्या जमीन गट नं. ५७० मध्ये साडेसात एकर जमिनीपैकी पावणेचार एकर ...

The fire at the substation burned drip material along with orchard leaves | सबस्टेशनमध्ये लागलेल्या आगीमुळे फळबागेच्या पानांसह ठिबकचे साहित्य जळाले

सबस्टेशनमध्ये लागलेल्या आगीमुळे फळबागेच्या पानांसह ठिबकचे साहित्य जळाले

Next

भोपसेवाडी-जवळा (ता. सांगोला) येथील शेतकरी निलेश सदाशिव माने यांच्या जमीन गट नं. ५७० मध्ये साडेसात एकर जमिनीपैकी पावणेचार एकर परिसरात चिंच पेरू, सीताफळ व डाळिंबाची फळबाग लागवड केली आहे. त्यांच्या शेतजमिनीच्या उत्तरेकडील बाजूच्या शेतास लागून महावितरण कंपनीचे ३३/११ उपकेंद्र आहे. त्यास तारचे कंपाउंड आहे. दरम्यान शनिवारी दु. २ च्या सुमारास सबस्टेशनमध्ये अचानक शॉर्टसर्किट होवून लागलेल्या आगीत गवताने पेट घेतला. त्याची आग पसरून निलेश माने यांच्या शेतातील फळबागेला लागलेली आग पाहून वायरमन हिंगमिरे यांनी फोन करून माने यांना कळवले. निलेश माने पती पत्नी व मित्र अश्विन जरग यांनी सदरची आग विझवली. मात्र या आगीत बागेतील झाडांची पाने जळाली. तर ठिबक सिंचन पाईप जळून सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत निलेश सदाशिव माने यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे.

Web Title: The fire at the substation burned drip material along with orchard leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.