प्रथमेश म्हेत्रे यांची अन्नछत्रला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:20 AM2021-01-18T04:20:57+5:302021-01-18T04:20:57+5:30

चपळगाव : दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती प्रथमेश शंकर म्हेत्रे यांनी अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाला भेट दिली. ...

First of all, Mhetre's visit to Annachhatra | प्रथमेश म्हेत्रे यांची अन्नछत्रला भेट

प्रथमेश म्हेत्रे यांची अन्नछत्रला भेट

Next

चपळगाव : दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती प्रथमेश शंकर म्हेत्रे यांनी अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाला भेट दिली. यावेळी मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अन्नछत्रच्या उपक्रमाचे आणि व्यवस्थापनाचे कौतुक केले.

यावेळी अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, बाबासाहेब पाटील, नगरसेवक सद्दाम शेरीकर, मैनुद्दीन कोरबू, सरफराज शेख, मुबारक कोरबू, विश्वनाथ हडलगी, राहुल बकरे, निखिल पाटील व न्यासाचे सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब पोळ, अप्पा हंचाटे, शहाजी यादव, नामा भोसले, दत्ता माने, बाळासाहेब घाडगे उपस्थित होते.

----

सप्ताहभरात मान्यवरांच्या भेटी

मागील सप्ताहभरात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास औंधच्या तहसीलदार तृप्ती उमेश पाटील, मुंबई कोषागार कार्यालयातील कर्मचारी, सोलापूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक एस.एस.पिंड, अशोकराव जाधव, वाशीमचे न्यायाधीश जगन्नाथ वाघ, सोलापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नाना सरवदे, हुबळी धारवड पालिकेचे माजी महापौर दीपक चिंचोरे, महाराष्ट्राचे हास्यसम्राट समीर चौगुले, महाराष्ट्र केसरी अभिजित कटके, जयहिंद फूड बँकेचे सतीश तमशेट्टी, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, अहमदनगर महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रेश्मा आठरे, आयसीआयसीआय बॅँकेचे विभागीय अधिकारी राजीव दुबे यांनी अन्नछत्रला भेट दिली.

---

फोटो : १७ चप्पळगाव

अन्नछत्र मंडळाला भेट दिल्यानंतर प्रथमेश म्हेत्रे यांचे स्वागत करताना विश्वस्त अमोलराजे भोसले.

Web Title: First of all, Mhetre's visit to Annachhatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.