पोस्टल मतांची होणार प्रथम मोजणी
By admin | Published: May 13, 2014 02:15 AM2014-05-13T02:15:30+5:302014-05-13T02:15:30+5:30
जिल्हाधिकारी : निवडणूक आयोगाच्या काही नव्या सूचनांची अंमलबजावणी
सोलापूर: दोन्ही लोकसभा मतदारसंघातील पोस्टल मतांची प्रथम मोजणी होणार असून, त्यानंतर सर्वच विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणी संदर्भात अधिकारी व कर्मचार्यांचे शेवटचे प्रशिक्षण १५ मे रोजी होणार आहे. शुक्रवार दिनांक १६ मे रोजी सकाळी ८ वाजता पोस्टल मतांची मोजणी केली जाणार आहे. पोस्टल मतमोजणीसाठी प्रत्येक उमेदवाराच्या एका प्रतिनिधीला आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशिनची मोजणी सुरू होईल असे जिल्हाधिकारी डॉ. गेडाम म्हणाले. एकाचवेळी दोन्ही लोकसभा मतदारसंघातील सर्वच १२ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होईल.
--------------------------------------
मोबाईल वापरावर बंदी ४आयोगाच्या पहिल्या आदेशानुसार निवडणूक निरीक्षकालाच मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यास परवानगी होती. सुधारित आदेशानुसार निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकार्यांनाही मोबाईल वापरण्यास परवानगी दिली आहे. अन्य कोणालाही मतमोजणी स्थळी मोबाईल वापरता येणार नाही.
-------------------------------
अशी असेल मतमोजणी...
सकाळी ६:३० वाजता ईव्हीएम मशिनच्या स्टाँगरुम उघडणार ४प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल ४प्रत्येक टेबलला एका उमेदवाराचा एक प्रतिनिधी आतमध्ये असेल ४निवडणूक निरीक्षक प्रत्येक राऊंडच्या दोन मशिनची तपासणी करणार आहेत ४मतमोजणीत चूक आढळली तर मोजणी करणार्यावर कारवाई, त्याने मोजणी केलेल्या त्या राऊंडच्या सर्व मशिनची फेरमतमोजणी करण्याच्या नव्या सूचना आयोगाने दिल्या आहेत ४मतमोजणी अधिकार्यांनी हस्तलिखित व संगणकीय बेरीज करावयाची आहे ४बेरजा तपासणीसाठी मायक्रो निरीक्षक (बँकांचे अधिकारी) नेमले जाणार आहेत