शाळेच्या पहिल्या दिवशीच ग्रामस्थांनी शाळेला लावले कुलूप, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:25 PM2018-06-15T15:25:46+5:302018-06-15T15:25:46+5:30
माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथे रिक्त असलेली शिक्षकाची जागा भरण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शाळेस पहिल्याच दिवशी कुलप लावून शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले़
वडशिंगे : माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथे रिक्त असलेली शिक्षकाची जागा भरण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शाळेस पहिल्याच दिवशी कुलप लावून शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले़ याचवेळी शासनाचा निषेध करीत ग्रामस्थांनी भजन, किर्तन सादर केले़ मात्र विस्तार अधिकारी व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाई व एक महिन्याच्या आत जागा भरण्याचे आश्वासन दिल्या नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनाने शिक्षण विभागाची तारांबळ उडाली असल्याचे चित्र पहायला मिळाले. परिसरातील सर्वत्र शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वगात चॅकलेट, फुगे, गुलबपुष्प देऊन पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्याचे कार्यक्रम होत आसताना लोंढेवाडी येथे आंदोलनाने सुरूवात झाली़ यावेळी विस्तार अधिकारी बंडू शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रशासन व ग्रामस्थाकडून यांच्या वतीने एक महिन्यात शाळेस शिक्षक देण्यात येणार आसल्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रमास्थाकडून हे अंदोलन मागे घेण्यात आले आहे.
यावेळी शाळेस कुलुप लावल्याने विद्यार्थी गेट बाहेर चालु असलेल्या आंदोलनात सामील झाल्याचे पहायला मिळाले. या ठिकाणी पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे़ या शाळेत ८० ते ९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिली ते पाचवी पर्यंत तीन शिक्षक तर सहावी व सातवी साठी प्रत्येकी एक शिक्षकाची नेमणूक होती. मात्र गेल्या वर्षी एक शिक्षकाची बदली झाली होती. त्या जागी दुसºया शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही. शालेय पत्रव्यवहार करण्यास व मुख्याध्यापक पदाची दोन्ही जबाबदाºया एका शिक्षकाकडे आहे. शिक्षक अप्रशिक्षीत असल्याने त्या शिक्षकाला वर्षातून तीन वेळा २८ दिवस प्रति प्रशिक्षण याप्रमाणे प्रशिक्षण घेण्यासाठी जावे लागते यामुळे दोन शिक्षक किती वर्गाला शिकवणार हा प्रश्न निर्माण झाल्याने आंदोलन करण्याची वेळ आल्याचे माजी सरपंच संतोष लोढे यांनी सांगितले़
यावेळी माजी सरपंच रामहरी लोंढे संतोष लोंढे, विस्तार अधिकारी बंडू शिंदे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादा इंगळे, केंद्रप्रमुख विष्णू बोबडे, पांडुरंग बोबडे, पंढरीनाथ बोबडे, सुरेश लोंढे, दशरथ इंगळे, भारत बोबडे, बाबा लोंढे, संदीप लोंढे, जाकीर तांबोळी, राजू तांबोळी, परमेश्वर देवकर, कृष्णा बोबडे, शोभा शिंदे, साधना मोरे, निकीता गाडेकर, सुजाता सुतार, मंगल कदम, भाऊसाहेब बोबडे, अतुल केदार, दिलीप लोंढे, नामदेव मोरे, बिनु बोबडे, सर्जेराव लोंढे, प्रकाश आवघडे, ज्ञानदेव मुळुक आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.