करमाळ्यात आशा स्वयंसेविकेनं घेतला पहिला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:20 AM2021-01-17T04:20:24+5:302021-01-17T04:20:24+5:30
दुपारी ३ वाजेपर्यंत ५१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. एकाही लाभार्थ्यांना कुठलाही त्रास झाला नाही. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, प्राथमिक ...
दुपारी ३ वाजेपर्यंत ५१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. एकाही लाभार्थ्यांना कुठलाही त्रास झाला नाही. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयातील सर्व ९२ कर्मचाऱ्यांवर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. सोमवारपासून उर्वरित लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. करमाळा तालुक्यासाठी ५५० कोरोना लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर गायकवाड व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शेगर, तहसीलदार समीर माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज घोगरे, डॉ. कोळेकर, डॉ. सोनवणे, तालुका समूह संघटक विवेक ओहोळ, आदी उपस्थित होते.
-----
फोटो ओळी :करमाळा तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस आशा स्वंयसेविका वनिता गावडे यांना देताना परिचारिका शिंदे.
----
कोरोनाच्या नऊ ते दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये गावात कोरोनासदृश रुग्णांचा जीव धोक्यात घालून सर्व्हे केला व लोकांचे प्रबोधन केले. आज मला तालुक्यात सर्वप्रथम कोरोना प्रतिबंधक लस देऊन माझा सन्मान झाला. लस टोचून घेतल्यानंतर मला कोणताच त्रास झाला नाही. लस सुरक्षित आहे.
- वनिता गावडे,आशा स्वंयसेविका, करमाळा.
-----१६वनिता गावडे