पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा कुंभार यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 05:58 AM2021-05-01T05:58:25+5:302021-05-01T06:00:07+5:30

सुनंदा कुंभार यांच्या पश्चात पती, तीन मुले आणि नणंद आहेत.

First female conductor Sunanda Kumbhar passes away | पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा कुंभार यांचे निधन

पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा कुंभार यांचे निधन

googlenewsNext

सोलापूर : प्रवाशांना नेहमीच सौजन्याने सेवा देणाऱ्या, लांब पल्ल्यांच्या मार्गावर जाण्याचे धाडस करणाऱ्या आणि  राज्यातील पहिल्या बॅचच्या महिला एसटी कंडक्टर सुनंदा अशोक कुंभार (४५, रा. नई जिंदगी, सोलापूर) यांचा शुक्रवारी कोरोनाने मृत्यू झाला.

सुनंदा या नोव्हेंबर २००० पासून एसटीच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. मनमिळाऊ स्वभाव आणि प्रवाशांना सेवा देण्यासाठीच्या तत्परतेमुळे त्यांनी सोलापूर विभागात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. ‘एसटी’त रुजू झाल्यापासून त्यांनी उस्मानाबाद, तुळजापूर, बार्शी आणि सोलापूर या ठिकाणी वाहक म्हणून सेवा बजावली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे  २१ एप्रिल रोजी त्यांनी कोरोनाची टेस्ट केली. ती पॉझिटिव्ह आली. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

सुनंदा कुंभार यांच्या पश्चात पती, तीन मुले आणि नणंद आहेत. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरव केला होता. दरम्यान, त्यांच्या मृत्यूची माहिती कर्मचाऱ्यांना कळताच कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

Web Title: First female conductor Sunanda Kumbhar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.