पहले सरकार फिर राम मंदीर; रामदास आठवले याचा सोलापुरात नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:52 PM2018-12-17T12:52:58+5:302018-12-17T12:57:47+5:30
सोलापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राम मंदीरप्रश्नी न्यायालयाचा निकाल लागण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रथम सरकार स्थापन ...
सोलापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राम मंदीरप्रश्नी न्यायालयाचा निकाल लागण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रथम सरकार स्थापन होईल त्यानंतरच राम मंदीराचा प्रश्न शांततेत सुटेल अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात दिला.
अनुसुचित जाती-जमातीच्या आढावा बैठक व अन्य कार्यक्रमासाठी रामदास आठवले हे सोलापुर जिल्ह्याच्या दौºयावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात २० कोटी एकर जमीन रिकाम्या आहेत़. या जमीनीचे वाटप केल्यास ४ कोटी कुटुंबांना निवारा मिळेल अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे़ ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ २०२१ मध्ये सरकारने पुन्हा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा, मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय न्यायालयात टिकला नाही तर सरकारने मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि इतर समाजाला मिळून २५ टक्के आरक्षण द्यावे असेही ते म्हणाले़.
पाच राज्याच्या निवडणुकीत तीन राज्यात भाजपाला पराभव पत्कारावा लागला़ हा काय मोदीचा पराभव किंवा राहुल गांधी यांचा विजय नाही़ पुढच्या दोन निवडणुकात पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येईल आणि नरेंद्र मोदी पुन्हा १० वर्ष पंतप्रधान म्हणून सेवा बजावतील असेही आठवले यांनी सांगितले़.
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात़..