ग्रामपंचायत कार्यालयात सँनिटायझर पंप बसवणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत तावशी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 04:25 PM2020-04-15T16:25:38+5:302020-04-15T16:30:52+5:30

कोरोनाशी लढा; आता गावात येणाऱ्या प्रत्येकाचे होणार निर्जंतुकीकरण

The first Gram Panchayat in Maharashtra to install a sanitizer pump at the Gram Panchayat office | ग्रामपंचायत कार्यालयात सँनिटायझर पंप बसवणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत तावशी...!

ग्रामपंचायत कार्यालयात सँनिटायझर पंप बसवणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत तावशी...!

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाशी दोन हात करण्यासाठी ग्रामस्थ एकवटलेकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गावात जनजागृती वर भरतावशी गावात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरूच

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील तावशी ग्रामपंचायतीने  ग्रामपंचायत कार्यालयात सँनिटायझर पंप बसवला आहे. गावात प्रवेश करणाऱ्या लोकांसाठी व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे  असा उपक्रम राबवणारे तावशी ग्रामपंचायती महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत असल्याचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले.

या सँनिटायझर पंपाचा शुभारंभ करण्यासाठी सरपंच सोनाली यादव, मंडल अधिकारी  बी. आर. मोरे, ग्रामसेवक ज्योती पाटील, तलाठी घोगरदरे, बाळु काका यादव, पोलीस पाटील कविराज आसबे, आरोग्यसेवक डॉ. साळुंखे, बागल व सर्व आशा सेविका व अंगणवाडी सेविका ग्रांमपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: The first Gram Panchayat in Maharashtra to install a sanitizer pump at the Gram Panchayat office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.