आयएएसच्या पदोन्नतीत पहिले नाव; तरीही सीईओ प्रकाश वायचळ यांना केले अनफिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 10:25 AM2020-09-27T10:25:55+5:302020-09-27T10:26:27+5:30
माहिती अधिकारात प्रकार उघड: उच्च न्यायालयात धाव घेण्याची केली तयारी
सोलापूर: आयएएसच्या पदोन्नतीत प्रथम क्रमांकाचे नाव असतानाही अनफिट दाखवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना डावलेले असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. या अन्यायाबाबत उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे वायचळ यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाने राज्यातील २३ अधिकाºयांची आयएएसच्या दर्जावर पदोन्नती केली. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २0१८ या कालावधीत रिक्त झालेल्या भारतीय प्रशासन सेवा (महाराष्ट्र राज्य संवर्ग) या पदावर या अधिक़ाºयांची पदोन्नतीने निवड केल्याचे भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी जाहीर केले. यादीत नाव न आल्याने वायचळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे विचारणा केली.
पण तोवर गोवर्धन दिकोंडा व रामचद्र उबाळे यांनी माहितीच्या अधिकाºयात या पदोन्नती कशा झाल्या याची युनिय्न पब्लिक सर्व्हिस कमिशनकडे माहिती मागितली. १४ सप्टेंबर रोजी युपीसीचे सचिव जी. सी. शहा यांनी दिलेल्या माहितीमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. महाराष्ट्र शासनाने शिफारस केलेल्या नावांमधून समितीचे अध्यक्ष भारत व्यास यांच्या चार सदस्यीय समितीने ७ आॅगस्ट रोजी बैठक घेऊन पदोन्नतीचे नावे अंतिम केली. या समितीकडे आलेल्या नावांमध्ये महिले नाव सोलापूर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांचे होते. त्यांच्या नावापुढे अनफिट असा शेरा मारून पदोन्नती नाकारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या चार जणांनाही वगळले
पदोन्नतीमध्ये ब्रीजीलाल बिबे, एस. सी. पाटील, सी. एच. पराटे, एस. टी. कादबाने यांनाही वगळण्यात आले आहे. या चार जणांबाबत कमिटीमध्ये चर्चा झाल्याचे नमूद केले आहे. चर्चेत या अधिक़ाºयांविरूद्ध चौकशी सुरू असल्याने नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. पण वायचळ यांच्यावर चर्चा झालेली नसताना अंतिम यादीत फक्त अनफिट असा शेरा मारल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी दोनवेळा अन्याय
पदोन्नतीतून नाव कसे वगळले गेले याबाबत विचारले असताना वायचळ यांनी यापूर्वी दोनवेळा असा प्रकार घडल्याचे सांगितले. आतापर्यंतच्या सेवेत व्हेरी गुड असा शेरा असताना विभागीय चौकशीचे कारण दाखवून यापूवीं यादीत नाव समाविष्ट केले नव्हते. त्याबाबत कॅटमध्ये धाव घेतली असून, सुनावणी प्रलंबित आहे. आता फाईल व्यवस्थित क्लिअर असताना नाव वगळल्याने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.
अशी आहे वायचळ यांची कामगिरी
वायचळ हे मूळचे औरंगाबादचे असून, ९ मार्च १९९४ रोजी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली.२0१६ मध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली. मराठवाड्यात त्यांनी बºयाची ठिकाणी विविध पदावर काम केले. १८ जुलै २0१९ रोजी त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी म्हणून पदभार स्वीकारला.