पहिल्या ऑनलाइन मराठी संमेलन स्वागताध्यक्षपदाचा मान वडवळच्या मोकाशींना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:38 AM2020-12-15T04:38:19+5:302020-12-15T04:38:19+5:30
वैश्विक मराठी भाषिक समाजाच्या निर्मितीसाठी, जगभरात विखुरलेल्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मराठी बांधवांना एक जागतिक व्यासपीठ मिळावे म्हणून या ...
वैश्विक मराठी भाषिक समाजाच्या निर्मितीसाठी, जगभरात विखुरलेल्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मराठी बांधवांना एक जागतिक व्यासपीठ मिळावे म्हणून या क्षेत्रातील अनेक जण परिश्रम घेत आहेत. यामध्ये वडवळचे धनंजय मोकाशी यांनी महाराष्ट्र मंडळ अबुधाबीचे विश्वस्त म्हणून कार्य करीत असताना, आता त्यांना स्वागताध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. कोरोनामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत २८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत हे ऑनलाइन संमेलन होणार आहे. या महासंमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, महास्वागताध्यक्षपदी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन तर महासंरक्षक म्हणून बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ अमेरिकेच्या डॉ. विद्या जोशी यांची निवड झाली.
कोट :::::::
या संमेलनासाठी नि:शुल्क ऑनलाइन प्रवेश नोंदणी आहे. सहभागी होणाऱ्यांना सहभाग ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. साहित्य, कला, संस्कृती, उद्योजकता, युवाशक्ती, प्रबोधन, परिसंवाद, कविता या संमेलनात असून, जागतिक मराठी व्यासपीठावर प्रत्येक मराठी बांधवांना आमचे आग्रहाचे आमंत्रण आहे.
- धनंजय मोकाशी,
स्वागताध्यक्ष, विश्व मराठी संमेलन, अबुधाबी
फोटो
१४धनंजय मोकाशी