माळशिरसमध्ये साकरतेय शहरातलं पहिलं उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:50+5:302021-06-16T04:30:50+5:30
या उद्यानात वेगवेगळ्या प्रकारची शोभिवंत झाडे फेरफटका मारण्यासाठी पट्टे बसण्यासाठी सिमेंट बाकडे अशा वेगवेगळ्या स्वरूपात बागेचे सुशोभिकरण केले जाणार ...
या उद्यानात वेगवेगळ्या प्रकारची शोभिवंत झाडे फेरफटका मारण्यासाठी पट्टे बसण्यासाठी सिमेंट बाकडे अशा वेगवेगळ्या स्वरूपात बागेचे सुशोभिकरण केले जाणार आहे.
शहराची लोकसंख्या वाढत आहे मात्र शहर परिसरात नागरिकांना उद्यान उपलब्घ नव्हते यासाठी नागरिकांमधून मागणी करण्यात आलेली होती. शहरात सध्या काही मोजक्या जागा उद्यान तयार करण्याच्या दृष्टीने योग्य होत्या. त्यानुसार नगरपंचायतीने या जागेची निवड केली व त्यानुसार विविध संघटना नागरिकांच्या मदतीने बगीच्या बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
----
शहरातील पहिल्या बगिचाचे निर्मिती या ठिकाणी होत आहे या उद्यानाच्या निर्मितीमध्ये नगराध्यक्ष, पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांचे मोठे सहकार्य आहे. यामुळे शहराच्या सौदर्यांत वाढ होणार आहे. सध्या या उद्यानासाठी लोकवर्गणीतून वेगवेगळ्या प्रकारचे सुशोभीकरण करण्यासाठी मदतीचे हात पुढे येत आहेत.
-मारुती देशमुख, नगरसेवक, माळशिरस
---
फोटो : १५ माळशिरस