आधी बारावीचा पेपर, मगच पित्यावर अंत्यसंस्कार! वडिलांचं पार्थिव घरात ठेऊन ग्रामस्थांनी तुकारामला पाठवलं परीक्षेला

By रवींद्र देशमुख | Published: March 3, 2023 01:50 PM2023-03-03T13:50:37+5:302023-03-03T13:51:07+5:30

Solapur: वडिलांचा मृतदेह घरात ठेवून मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याला बारावीच्या परीक्षेसाठी पाठविले. पेपर संपल्यानंतर वडिलांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.

First the 12th paper, then the funeral for the father! Keeping his father's body in the house, the villagers sent Tukaram for examination | आधी बारावीचा पेपर, मगच पित्यावर अंत्यसंस्कार! वडिलांचं पार्थिव घरात ठेऊन ग्रामस्थांनी तुकारामला पाठवलं परीक्षेला

आधी बारावीचा पेपर, मगच पित्यावर अंत्यसंस्कार! वडिलांचं पार्थिव घरात ठेऊन ग्रामस्थांनी तुकारामला पाठवलं परीक्षेला

googlenewsNext

- रवींद्र देशमुख/विलास मासाळ
मंगळवेढा - वडिलांचा मृतदेह घरात ठेवून मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याला बारावीच्या परीक्षेसाठी पाठविले. पेपर संपल्यानंतर वडिलांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील कल्लाप्पा आबा रूपटक्के (वय ६०) यांचे आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता अकस्मात निधन झाले. त्यामुळे घरात दुःखाचा डोंगर पसरला, अशा परिस्थितीत सर्व नातेवाईक दुपारच्या सत्रात अंत्यविधी करण्यासाठी जमा झाले.

दरम्यान मुलगा तुकाराम याचा बारावी गणित विषयाचा आज पेपर सोड्डी येथील एम.पी मानसिंगका विद्यालय येथे असल्याने वडिलांच्या निधनामुळे पेपरला गैरहजर राहून त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हुलजंती येथील गोविंद भोरकडे व ग्रामस्थांनी एकत्र येत त्याला परीक्षेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला व त्याबाबत प्राचार्य बसवराज कोरे यांना हा प्रकार कानावर घातला, त्याचा बारावीचा पेपर होईपर्यंत वडिलांचा अंत्यविधी दुपारी दुपारपर्यंत पुढे ढकलण्यात आला.

Web Title: First the 12th paper, then the funeral for the father! Keeping his father's body in the house, the villagers sent Tukaram for examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.