ध्वजारोहणास पन्नास-साठ वर्षांत पहिल्यांदाच गणपतराव देशमुख यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:27 AM2021-08-17T04:27:50+5:302021-08-17T04:27:50+5:30
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सावटाखाली गर्दी न करता सांगोला शहर व तालुक्यात (१५ ऑगस्ट) ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सावटाखाली गर्दी न करता सांगोला शहर व तालुक्यात (१५ ऑगस्ट) ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. सांगोला तहसील कार्यालय येथे तहसीलदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस कर्मचारी, उपस्थितांनी मानवंदना दिली. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, पोलीस निरीक्षक जगताप, सभापती राणी कोळवले, उपसभापती नारायण जगताप, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील भोरे, नगरसेवक सूरज बनसोडे, रिपाइं तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, बाबुराव खंदारे, बांधकाम अभियंता अशोक मुलगीर, स्वीय सहायक दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.
सांगोला नगरपरिषद प्रांगणात नगराध्यक्षा राणी माने यांनी ध्वजारोहण केले. यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, कार्यालयीन अधीक्षक अश्विनी अडसूळ, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी ध्वजारोहण केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, नागेश यमगर, हेमंत काटकर, संदेश नाळे, सहाय्यक फौजदार कल्याण ढवणे, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समिती प्रांगणात सभापती राणी कोळवले यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपसभापती नारायण काटकर, गटविकास अधिकारी संतोष राऊत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.