इतिहासात पहिल्यांदाच; कोरोनामुळे पंढरपुरातील विठ्ठल मंदिर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:52 PM2020-03-17T12:52:58+5:302020-03-17T12:54:28+5:30
मंदिर समितीचे सदस्य राम कदम यांची मुंबईत घोषणा; कोरोना व्हायरसच्या धर्तीवर घेतला निर्णय
पंढरपूर : मागील पंधरा दिवसापासून कोरोना व्हायरसच्या धर्तीवर अनेक मोठे निर्णय होत आहेत. परंतु श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद करण्याबाबत अनेक दिवसांपासून फक्त चर्चा होती. मात्र मंगळवारी सकाळी मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर बंद करण्याबाबत १८ मार्च रोजी मंदिर समितीची बैठक होणार होती. परंतु मात्र मंदिर समितीचे सदस्य तथा आमदार राम कदम यांनी १७ मार्च (मंगळवार) रोजी मुंबई येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद करण्यात आल्याची घोषणा केली आहे. परंतु याबाबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी यांच्याकडे आदेश आलेले नाहीत. यामुळे मंदिर बंद होण्यापूर्वी श्री पांडुरंगाचे सावळे रूप पाहिलेल्या भाविकांनी आनंद व्यक्त केला.