तिरंगी लढतीमुळे प्रथमच चुरस वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:55 AM2021-01-13T04:55:22+5:302021-01-13T04:55:22+5:30
मागील निवडणुकीप्रमाणेच विठ्ठल परिवार एकत्र निवडणूक लढवित आहे. तर परिचारक गटही स्वतंत्र पॅनल टाकून निवडणुकीत उभा आहे. गेल्या काही ...
मागील निवडणुकीप्रमाणेच विठ्ठल परिवार एकत्र निवडणूक लढवित आहे. तर परिचारक गटही स्वतंत्र पॅनल टाकून निवडणुकीत उभा आहे. गेल्या काही महिन्यांपासून आ. बबनराव शिंदे समर्थक, स्वाभिमानी, बळीराजा शेतकरी संघटना याशिवाय विठ्ठल, पांडुरंग परिवारातीलच काही नाराज कार्यकर्त्यांनी एकत्र येत तिसऱ्या आघाडीची मोट बांधताना दिसत होते. त्यांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्नही केला. मात्र एकमत न झाल्याने त्यांनी स्वतंत्र पॅनल टाकत पटवर्धन कुरोलीच्या निवडणुकीत प्रथमच तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय काही अपक्षही तिन्ही पॅनल वगळून काही प्रभागात निवडणूक लढवित आहेत.
सत्ताधारी परिचारक गट आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. विठ्ठल परिवार यावर्षी पुन्हा तोच फटका बसू नये, याची काळजी घेत निवडणुकीची सूत्रे जुळवीत आहे. तर दोघांना पर्याय म्हणून तिसरी आघाडी विजयासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीत पहिल्यांदाच तिसरा पॅनल
पटवर्धन कुरोलीच्या आजपर्यंतच्या इतिहासात ग्रामपंचायत असो अथवा सोसायटी प्रत्येक निवडणुकीत स्व. आ. भारत भालके, आ. परिचारक, काळे गट यांनी आघाड्या करूनच निवडणूक लढविल्याचा इतिहास आहे. मात्र यावर्षी काही तरूणांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र ११ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत.