गुरववाडीत प्रथमच होतेय तिरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:55 AM2021-01-13T04:55:55+5:302021-01-13T04:55:55+5:30
अक्कलकोट : गुरव समाजाविरुद्ध पुजारी पॅनल अशी लढत अक्कलकाेट तालुक्यात गुरववाडीत रंगली आहे. मागील ५० वर्षांत पुजारी पॅनलला अपवाद ...
अक्कलकोट : गुरव समाजाविरुद्ध पुजारी पॅनल अशी लढत अक्कलकाेट तालुक्यात गुरववाडीत रंगली आहे. मागील ५० वर्षांत पुजारी पॅनलला अपवाद वगळता गुरव पॅनलकडे बहुतांशवेळा सत्ता राहिली आहे. यंदा मात्र चित्र वेगळेच आहे. गुरव व पुजारी या दोन्ही पॅनलला विरोध दर्शवित काही तरुण एकत्रित येत तिसरी आघाडी उघडली आहेत. यातिरंगी लढतीत कोण सत्ता मिळवणार याकडे लक्ष लागले आहे.
अक्कलकोट शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर गुरववाडी आहे. सिंचन क्षेत्र अत्यल्प आहे. गावातील असंख्य युवक पुणे, मुंबई येथे रोजीरोटीसाठी स्थलांतरित झाले आहेत. तालुक्यात असे एकमेव गाव आहेत की या गावात ८० टक्के गुरव समाज असून, उर्वरित धनगर, लिंगायत मागासवर्गीय असे जातीय समीकरण ठरते. मागील ५० वर्षांपासून गुरव समाजविरुद्ध धनगर समाजाचे पुजारी पॅनल अशी लढत बहुतांशवेळा पहायला मिळाली आहे. दोन वेळा अपवाद वगळता सातत्याने गुरव समाज सत्तेवर राहिलेला आहे. निवडणूक मात्र कधीही बिनविरोध झालेली नाही. दोन्ही पॅनलमध्ये एक, दोन उमेदवार परस्परविरोधी गटाचे राहतात. यंदाही तसेच चित्र आहे.
यंदा प्रथमच तिसरी आघाडी उदयास आली आहे. गावातील काही तरुण पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीत असलेले एकत्रित येऊन पारंपरिक विरोधक दोन्ही पॅनलसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
---
गुरव समाजाचे शीलवंती देवी ग्राम विकास पॅनल, पुजारी गटाचे चिनप्पामाराय्या परिवर्तन पॅनल, शीलवंती देवी परिवर्तन पॅनल अशी तिरंगी लढत होत आहे. एकूण मतदार १ हजार २०० आहे. प्रभाग एकूण तीन, जागा ७ असून नवीन आरक्षणानुसार ४ महिला, ३ पुरुष अशी रचना आहे.
--
मनोहर मुनाळे विरुद्ध साडभाऊ श्रीमंत वंकारी यांच्यात लढत होत आहे. लक्ष्मण पुजारी विरुद्ध म्हाळप्पा पुजारी या मावस भावांच्या लढतीकडे लक्ष लागले आहे. सुशीलाबाई मणुरे व शिवकुमार मणुरे या आई मुलांनी एकाच पॅनल अधून नाशिब अजमावत आहेत. तसेच मल्लिनाथ इंगळगी, श्रीदेवी इंगळगी या दीर-भावजयी सुद्धा एकाच पॅनल मधून स्वत:चे नशीब आजमावत आहेत. तसेच बनसिद्ध वंकारी, सारिका वंकारी, श्रीमंत वंकारी हे तिघे एकाच भावकीतील आहेत.