पहिल्या लाटेनं तारलं, दुसऱ्या लाटेत या गावांना घेरलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:32+5:302021-04-29T04:17:32+5:30

- राधा जाधव, सरपंच पिंपरी (आर) ता. बार्शी ----- वर्षभर आमचे गाव कोरोनापासून चार हात लांब होते. लोकांनी सुद्धा ...

The first wave saved, the second wave surrounded these villages | पहिल्या लाटेनं तारलं, दुसऱ्या लाटेत या गावांना घेरलं

पहिल्या लाटेनं तारलं, दुसऱ्या लाटेत या गावांना घेरलं

Next

- राधा जाधव, सरपंच पिंपरी (आर) ता. बार्शी

-----

वर्षभर आमचे गाव कोरोनापासून चार हात लांब होते. लोकांनी सुद्धा सहकार्य केले होते. यंदा नागरिक फारशी काळजी घेताना दिसत नाहीत. ग्रामपंचायत व आरोग्य यंत्रणा सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आंध्रप्रदेशातील श्रीशैलम यात्रेसाठी जाऊन आलेल्या काही लोकांमुळे गावात कोरोनाचे शिरकाव झाला. हा संसर्ग वाढू नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

- लक्ष्मीपुत्र बिराजदार, सरपंच, भोसगे ता. अक्कलकोट

----

गेल्या वर्षी आमच्या गावात कोरोना संक्रमण नव्हते, परंतु यावर्षी कोरोनाचे आमच्या गावात व परिसरात रुग्ण वाढले आहेत. बाहेरगावी जाऊन येथील लोक काळजी न घेता घरी येण्यामुळे हा फटका कुटुंबातील सदस्यांना बसला. यामुळे येथून रुग्ण आढळून येत आहेत. तरी सर्वांनी मास्क, सॅनिटायजर वापरत काळजी घ्यावी.

- लतिका संदीप शिंदे, सरपंच, शिंदेवाडी (ता. माढा)

फोटो

२८लतिका शिंदे-सरपंच

Web Title: The first wave saved, the second wave surrounded these villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.