विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: श्री क्षेत्र पंढरपूर येथे राज्यातील पहिले ३४ फलाटांचे यात्रा बसस्थानक

By सचिन लुंगसे | Published: July 16, 2024 03:00 PM2024-07-16T15:00:14+5:302024-07-16T15:03:23+5:30

या भव्य प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. 

First Yatra Bus Stand in the State at Sri Kshetra Pandharpur | विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: श्री क्षेत्र पंढरपूर येथे राज्यातील पहिले ३४ फलाटांचे यात्रा बसस्थानक

विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: श्री क्षेत्र पंढरपूर येथे राज्यातील पहिले ३४ फलाटांचे यात्रा बसस्थानक

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : श्री. क्षेत्र पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या जागेवर राज्यातील पहिले ३४ फलाटांचे अति- भव्य अशा चंद्रभागा यात्रा बसस्थानक व त्याला जोडूनच एक हजार यात्रेकरू एकावेळी राहतील, अशा यात्री निवासाचे लोकार्पण आषाढी एकादशी दिवशी (१७ जुलै) सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित राहणार आहेत.

पंढरपूर येथे एसटी महामंडळाचे अद्यावत बस स्थानक आहे.  तेथून शेकडो बसेस राज्यभरात प्रवाशांची नियमित ने-आण  करतात. तथापि, आषाढी आणि कार्तिकी सारख्या मोठ्या यात्रेसाठी ते बसस्थानक अपुरे पडत होते. म्हणून एसटी महामंडळाकडून आपल्या  ११  हेक्टर जागेवर ३४  फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. याबरोबरच पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविक- यात्रेकरूंची निवासाची अल्प दरात सोय व्हावी या दृष्टीने बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे. या यात्री निवासामध्ये एकाच वेळी सुमारे १ हजार यात्रेकरू राहू शकतात. येथे एसटी कर्मचारी व यात्रेकरूंसाठी २ सुसज्ज उपहारगृहे देखील बांधण्यात आली आहेत. हा राज्यातील एसटी महामंडळाचा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी ३३ कोटी रुपये खर्च आला आहे. या भव्य प्रकल्पाचा  लोकार्पण सोहळा आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. 

या बस स्थानकावरून आषाढी आणि कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातील सर्व ठिकाणी एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. येथे एसटीच्या सुमारे ५०० कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली असून याबरोबरच सुमारे १ हजार यात्रेकरू देखील राहतील, असे भव्य यात्री निवास बांधण्यात आले आहे.

Web Title: First Yatra Bus Stand in the State at Sri Kshetra Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.