म्हसेवाडी तलावात माशांचा तडफडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:20 AM2021-05-17T04:20:43+5:302021-05-17T04:20:43+5:30

--- टेंभुर्णी ग्रामपंचायतीमध्ये परिचारिकांचा सत्कार टेंभुर्णी : टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ...

Fish die in Mhasewadi lake | म्हसेवाडी तलावात माशांचा तडफडून मृत्यू

म्हसेवाडी तलावात माशांचा तडफडून मृत्यू

Next

---

टेंभुर्णी ग्रामपंचायतीमध्ये परिचारिकांचा सत्कार

टेंभुर्णी : टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका, आरोग्यसेविका यांचा टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच प्रमोद कुटे, गणेश केचे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अमोल माने, डॉ.विक्रांत रेळेकर, डॉ.प्रणिती खोटे, औषध निर्माता सतीश लोंढे, लक्ष्मण गणगे, हनुमंत डांगे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नितीन हिलाले, के.एम.घंटे, यु. एस.मोरे, नागनाथ धनवे, किशोर घेचंद आदी उपस्थित होते.

---

१०० गरजू कुटुंबांना किराणा साहित्य

मोहोळ : कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे व्यवसाय व रोजगार ठप्प असल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून अशा शंभर कुटुंबांना शिवसेनेचे कार्यकतें सुहास आखाडे यांनी किराणा साहित्य व दीड हजार मास्कचे वितरण केले. मोहोळ शहरातील प्रभाग क्र. १२ व १३ मधील १०० गरजू कुटुंबांना घरी जाऊन किराणा साहित्याचे वितरण केले. यावेळी दादा दोडके, महेश गोडसे, सोमा दोडके, अविनाश गोडसे, विकास यादव, हरिभाऊ शिंदे, सागर काकडे, मुशारक शेख, अरबाज शेख, रेवण यादव उपस्थित होते.

---

बोरामणीत १३० जणांचे रक्तदान

द. सोलापूर : बोरामणी येथे पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे १३० जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्‌घाटन चन्नवीर मटगे यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे, बोरामणीचे सरपंच प्रकाश आवटे, उपसरपंच महिंद्र राजगुरू, बाबाजान हलसगे, आप्पा हलसगे, आकाश हेबळे, वैभव भाले, बालाजी कवडे, कासेगावचे उपसरपंच शंकर वाडकर, सागर सोलापुरे, लिंगराज पाटील आदी उपस्थित होते.

---

पेन्शन हक्क संघटनेतर्फे सीईओंना निवेदन

बार्शी : शिक्षक लसीकरण व विमा संरक्षणाबाबत पंचायत समिती बार्शी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिक्षक फ्रंटलाईन वर्कर म्हणून कोविड काळात जबाबदारीने काम करत आहेत. त्यांच्यासाठी ५० लाख विमा संरक्षण कवच मिळावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, संघटनेचे अध्यक्ष महेश जगताप सरचिटणीस प्रवीण देशमुख, महिला आघाडीप्रमुख सुलभा काळे, सदस्य विष्णू मिरगणे, मोहन पवार, बंडू गोरे आदी उपस्थित होते.

----

पालकमंत्र्यांनी कोरोना लस उपलब्ध करून द्यावी

सोलापूर : अंध, अपंग, पत्रकार, एस.टी. कर्मचारी, बँक कर्मचारी , १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस उपलब्ध करून द्या, अशी मागणी गटनेते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. पालकमंत्री यांनी शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय लसीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी मागणीचे निवेदन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले.

---

दुसऱ्या डोससाठी केंद्रावरील गर्दी टाळण्याचे आवाहन

सोलापूर : सध्या शहरात विविध भागांत एकूण २५ लसीकरण केंद्रांवरून लसीकरणाचे काम सुरू आहे. शासनाने दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार शहरात पहिला डोस घेतलेले व दुसऱ्या डोसकरिता ४५ दिवसांची मुदत संपलेल्या नागरिकांना केंद्रावर ऑफलाईन लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे इतरांनी लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये , असे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी केले आहे.

---

खर्डी येथील कोविड सेंटरमध्ये साहित्य वाटप

पंढरपूर : खर्डी येथे कै. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक विचार मंच यांच्या वतीने सीताराम महाराज महाविद्यालय खर्डी येथील कोविड रुग्ण विलगीकरण कक्षातील रुग्णांना मोफत वस्तूंचे वाटप करण्यात आले. सलग ३० दिवस मोफत सकस आहार वाटप उपक्रमाचा शुभारंभ प्रणव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये अंडी, काढा, चहा, मास्क, सॅनिटायझर यांचे वाटप करण्यात आले. खर्डी गावामध्ये व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून सीताराम महाराज महाविद्यालय येथे रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

--

परशुराम जयंतीनिमित वृक्षारोपण

सोलापूर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या शहर महिला आघाडीच्या वतीने श्री भगवान परशुराम जयंतीनिमित वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा आदर म्हणून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शहर महिला आघाडीने श्री भगवान परशुराम जयंतीनिमित कोणत्याही स्पर्धा न घेता पर्यावरणाची देखभाल म्हणून वृक्षारोपण करण्याचा संकल्प घेतला असे आघाडीच्या अध्यक्षा संपदा जोशी यांनी सांगितले.

---

कोविड सेंटरमध्ये साहित्य वाटप

टेंभुर्णी : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून व तसेच कोविड -१९ च्या साथीमुळे टेंभुर्णी परिसरातील कोरोना विलगीकरण कक्षात असलेल्या लोकांना, सामाजिक बांधिलकी म्हणून शंभू शासन प्रतिष्ठानच्या वतीने फळे, अंडी, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी अमोल सरडे, प्रज्वल पाटील, अविनाश भोसले, दीपक पाटील, प्रमोद ननवरे, रोहित थोरात, ओंकार रावळ, हनुमंत तावरे आदी उपस्थित होते.

---

---

अक्कलकोटमध्ये सीसी सेंटर सुरु

अक्कलकोट : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अक्कलकोट नगरपरिषद सज्ज असून लवकरच सीसी सेंटर देखील सुरु करण्यात येईल अशी ग्वाही नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी यांनी दिली. ते शनिवारी अक्कलकोट नगरपरिषदेच्या वतीने शहरात सॅनिटायझरिंग व जंतुनाशक फवारणी उद्घाटनप्रसंगी बोलत होते . याप्रसंगी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी, नगरसेवक जितेंद्र यारोळे, देविदास कवटगी, मलिक बागवान, सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष धनराज कांबळे यांच्यासह सफाई कर्मचारी उपस्थित होते.

---

डोंबरजवळगे येथे ५१ जणांचे रक्तदान

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगेतील श्री महालक्ष्मी मंदिर परिसर येथे मेडिकेअर ब्लड बँक सोलापूर व महात्मा बसवेश्वर जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती, रमजान ईद याचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ५१ जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन डोंबरजवळगेचे सरपंच चिदानंद माळगे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपसरपंच शिवलाल नारायणकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष गजानन जकिकोरे, संदीप गायकवाड, मराठा सेवा संघाचे आप्पू पवार, बंटी नारायणकर, परमेश्वर गुमते, सुनील उकरंडे, प्रमोद पवार, अनिल गवळी, युवराज सुलगडले आदी उपस्थित होते.

----

नान्नज येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण

उत्तर सोलापूर : नान्नज येथे अक्षय्य तृतीया मुहूर्त व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्मशानभूमीत खड्डे खोदून त्यामध्ये वड व पिंपळ, अशा ८ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुशील गवळी, सोमनाथ जाधव, सचिन भोसले, लक्ष्मण मुळे, राजू सावंत, अमर वाघमारे, बाळू पारवे, विष्णू मुळे, सतीश पाटील, शिवाजी गवळी, चेतन करंडे, गणेश टोनपे, बापू माळी, सुमित बोगे आदी उपस्थित होते.

---

Web Title: Fish die in Mhasewadi lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.